राजकिय

‘भाजपा ओबीसींचा आणि ओबीसी भाजपाचा’ हा आमचा मूलमंत्र…! – डॉ. आशिषराव र. देशमुख

Spread the love

 

 

गडचिरोली येथे ओबीसी जागर यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद.
 डॉ. आशिषराव र. देशमुख यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी जागर यात्रा.
 गडचिरोलीचे खासदार श्री. अशोकजी नेते, आमदार कृष्णाजी गजबे, श्री. प्रशांतजी वाघरे आदींनी केले उपस्थितांना मार्गदर्शन.

गडचिरोली / तिलोत्तमा हाजरा

संपूर्ण महाराष्ट्र भ्रमण करणाऱ्या भाजपाच्या ओबीसी जागर यात्रेतर्फे आज तिसऱ्या दिवशी गडचिरोली येथे दांडगा जनसंपर्क आणि भव्य मेळावा घेण्यात आला. भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी माजी आमदार डॉ. आशिषराव र. देशमुख यांच्या कुशल नेतृत्वात ओबीसी जागर यात्रा संपूर्ण महाराष्ट्र पादाक्रांत करीत आहे.

गडचिरोलीचे खासदार श्री. अशोकजी नेते यावेळी म्हणाले, “कॉंग्रेसच्या काळात आदिवासी गावे ओबीसीमध्ये आणि ओबीसी गावे आदिवासीमध्ये टाकून संभ्रम निर्माण कारण्यात आला. उद्धव ठाकरे सरकारने ओबीसी आरक्षणाची वाट लावली. कॉंग्रेस जनतेची दिशाभूल करीत आहे. १२ बलुतेदार ओबीसीमध्ये येतात. ऑगस्ट २०२३ च्या जीआर नुसार पदभरतीमध्ये आरक्षणाचे निकष लावून पदभरती व्हावी, ही अपेक्षा आहे. मोदीजींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने आणि राज्यातील महायुती सरकारने जनतेच्या हितासाठी अनेक चांगली कामे केली आहेत. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेत ३ लाखांपर्यंत कर्ज मिळणार, ही फार महत्वाची गोष्ट आहे.” त्यांनी या ओबीसी जागर यात्रेची स्तुती केली.

“पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या मागील ९ वर्षातील कार्यामुळे आणि राज्यातील महायुती सरकारच्या प्रयत्नांमुळे गडचिरोली जिल्ह्यात मोठा विकास झालेला बघायला मिळत आहे. सर्वांगीण विकासाचे कार्य या भाजपा सरकारमुळे सर्वत्र होत आहे. सुरजागड येथील पोलाद प्रकल्पामुळे गडचिरोली जिल्ह्यात मोठी रोजगार निर्मिती होणार आहे. ओबीसी समाजाच्या प्रगतीसाठी भाजपाने अनेक योजना राबविल्या आहेत. त्या महत्वाकांक्षी आणि विकासाभिमुख योजनाची माहिती ओबीसी समाजाला मिळावी, म्हणून या ओबीसी जागर यात्रेचे आयोजन आहे. ओबीसी-कुणबी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, त्यांच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, ही भाजपाची भूमिका आहे. जरांगे पाटील जनतेची दिशाभूल करीत आहेत, खरे म्हणजे राज्य सरकारने त्यांना ओबीसी आणि मराठा आरक्षणासंदर्भात काहीच आश्वासन दिलेले नाही. मराठ्यांना मिळालेलं आरक्षण उद्धव ठाकरे सरकारमुळे गेलं. गडचिरोली जिल्हा ‘पेसा’ कायद्यांतर्गत आला आहे. श्री. विजय वडेट्टीवारांनी ओबीसी विभागाचे मंत्री असतांना येथील भूमिधाराकांसाठी काय केलं, हा मोठा प्रश्न आहे. ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम त्यांनी केलं. गडचिरोली जिल्ह्यात सरकारी नोकर भरतीसाठी भाजपा प्रयत्न करेल. ओबीसींसाठी वैद्यकीय शिक्षणात आरक्षण आणि नि:शुल्क वसतिगृहाचा लाभ भाजपा सरकारने मिळवून दिला आहे. भाजपा ओबीसींचा आणि ओबीसी भाजपाचा हा आमचा मूलमंत्र असून ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. भाजपाचा निर्धार, ओबीसींचा करू उद्धार या तत्वावर भाजपा काम करीत आहे. राज्याचे मंत्री श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार या भागातील असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. आज काही परीट, नाव्ही, शिंपी व्यावसायिकांशी मी प्रत्यक्ष भेटून त्यांना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे महत्व समजावून सांगितले. या योजनेतून ओबीसी समाजाची मोठी प्रगती होणार आहे. १० लाख घरकुलांसाठी शासनाची योजना तयार आहे. कॉंग्रेस राजकारण करीत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे ते काहीतरी बोंबा ठोकत आहेत. महाराष्ट्र राज्यात बिहारच्या धर्तीवर जातीनिहाय सर्वेक्षण व्हावे, या माझ्या मागणीला उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. यामुळे ओबीसींच्या विकासाला गती मिळेल”, असे प्रतिपादन भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी माजी आमदार डॉ. आशिषराव र. देशमुख यांनी गडचिरोली येथे केले. याप्रसंगी ठिकठिकाणी आयोजित कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

आरमोरीचे आमदार कृष्णाजी गजबे, श्री. प्रशांतजी वाघरे आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भाजपाने ओबीसी समाजासाठी ज्या योजना सुरु केल्या आहेत, त्याबद्दल त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी आणि राज्य सरकार यांनी ओबीसींच्या कल्याणासाठी अनेक योजना आखल्या असून त्याचा १००% फायदा ओबीसी समाजाला होणार आहे, असे ते म्हणाले. भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्री. संजयजी गाते यांनी यावेळी ओबीसी समाजाच्या प्रगतीसाठी भाजपाचे कार्य विषद केले.

सौ. रेखाताई डोळस, सौ. संगिताताई रेवतकर, सौ. योगिताताई पिपळे, सौ. दिपाताई हिंग, श्री. रवींद्र गोटेफोडे, श्री. अनिल तिडके, श्री. अनिल पोहनकर, श्री. सदानंद कुथे, श्री. मुक्तेश्वर काटवे व इतर भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. हजारोंच्या संख्येत नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. भव्य जनसंपर्क पदयात्रेमुळे गडचिरोली येथे नव-चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. यात्रा सावली, मूल मार्गाने चंद्रपूरकडे रवाना झाली.

भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी डॉ. आशिषराव र. देशमुख आणि भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्री. संजय गाते यांच्या नेतृत्वात ओबीसी जागर यात्रा महाराष्ट्र पादाक्रांत करीत आहे. ही यात्रा पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातील ११ही जिल्हे पादाक्रांत करेल. पहिल्या टप्प्याचा समारोप उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पोहरादेवी, जि. वाशीम येथे होईल.

[ओबीसी जागर यात्रेची सुरुवात ०२ ऑक्टोबर २०२३ ला हिंगणघाटपासून झाली असून यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, रामटेक, काटोल, अकोला, शेगाव, वाशीम असा हा मार्ग राहील. ही यात्रा पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातील ११ही जिल्हे पादाक्रांत करेल. पहिल्या टप्प्याचा समारोप उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पोहरादेवी, जि. वाशीम येथे १२ ऑक्टोबर २०२३ ला होईल. नवरात्रानंतर उत्तर महाराष्ट्रात ही यात्रा सुरु राहील. भाजपा सत्तेत असून राज्य सरकारने ओबीसी समाजाच्या हितासाठी ज्या योजना राबविल्यात आणि जे कार्य केले, त्याबद्दल ओबीसी समाजाला माहिती मिळावी, हा या ओबीसी जागर यात्रेचा प्रमुख उद्देश आहे. जनतेने मोठ्या प्रमाणात या यात्रेत सहभागी व्हावे आणि ओबीसींचा आवाज बुलंद करावा, असे आवाहन भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी माजी आमदार डॉ. आशिषराव र. देशमुख यांनी केले आहे.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close