श्री.मंगलादेवी संस्थान मंगरूळ दत्त येथे यज्ञभूमी पूजन संपन्न
धामंनगाव रेल्वे : / प्रतिनिधी
श्री मंगलादेवी संस्थान मंगरुळ दत्त येथे शनिवार दी.१० व रविवार दी.११ फेब्रूवारी 2024 ला *५१ कुंडीय श्री.मंगलचंडी यज्ञमहोत्सवा चे *आयोजन केले आहे. या यज्ञात 101 यजमान जोड़पे बसणार आहे त्या करिता आज *’ यज्ञभूमि पूजन’* सम्पन्न झाले. आजच्या पुजेचे यजमान श्री.गोपालबाबू भूत ,सौ.राधाताई भूत तसेच श्री. प्रदीपजी फडणवीस व सौ. सुजाताताई फडणवीस यांच्या हस्ते प.मोहनमहाराज देव व प.विवेकमहाराज देव यानी पूजन पार पाडले.
श्री. मंगलचंडी यज्ञात ज्याना कुणाला सहभाग घ्यावयाचा असेल त्यांनी प.मोहनमहाराज देव मो.न.9158852236 वर संपर्क साधावा.
या देवस्थाना तर्फे दी १२ जानेवारी २०२४ पासून २४ फेब्रूवारी२०२४ पर्यंत एकूण ४२दिवसात एका व्यक्तिनि १०० वेळा सामूहिक श्री.हनुमान चालीसा चे पठन करण्याच्या उपासनेला सुरूवात झाली असून भरपूर प्रमाणात भक्तांचा प्रतिसाद मिळत आहे.
शनिवार दी. २४ फेब्रूवारी २०२४ ला सकाळी ९-०० वाजता आदरणीय श्री.मोहनजी भागवत व सर्व भक्तांच्या उपस्थितीत सामूहिक श्री.हनुमान चालीसा उपासना पठणाचा समापन समारोपीय सोहळा संपन्न होणार आहे.
यज्ञभूमी पूजन समारंभाला श्री. मंगलादेवी मंदिराचे सर्व विश्वस्त मंडळी तसेच श्री.भूषण पिंपळे, श्री प्रशांतजी शेटे, श्री. प्रवीणजी रघुवंशी , श्री सुदाम जांभुरे, श्री.मुरलीधर खंडार, श्री. प्रमोद शेटे, कु.गौरी भूत व श्री. मंगलादेवी मंदिराचे प्रसिद्धी प्रमुख श्री.वैभवजी पोतदार आणि गांवकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित कार्यक्रमाला होते.