हटके

अजबच हं ….! पोलीस म्हणतात बलात्कार झाले हे सांगू नका ! तुमची बदनामी होईल ! 

Spread the love

बलात्कारा ऐवजी दाखल केला विनयभंगाचा गुन्हा ? 

मुलीशी कोणी लग्न करणार नाही ! 

कानपूर / नवप्रहार मीडिया 

                    महिलांच्या बाबतीत कायदे कडक करण्यात आले तरी महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनेत घट होण्याऐवजी त्या वाढतच आहेत. अश्यातच जर बलात्कार पीडितेला पोलीसच सल्ला देत असतील की बलात्कार झाला असला तरी त्याची तक्रार देऊ नका ! त्यात तुमची बदनामी होईल. तुमच्या मुलीशी कोणी लग्न करणार नाही ! या घटनेने पोलिसांचा एक वेगळाच चेहरा जनते समोर आला आहे.

               बलात्कार पीडिता किंवा महिलांवर अत्याचार अथवा अन्याय झाल्यास त्यांची तक्रार प्रथम नोंदवून घ्या असा न्यायालयीन आदेश असताना सुधा कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्या पोलीस विभागवार आहे तो पोलीस विभागच जर पीडितेला तक्रार करण्यापासून रोकत असेल तर याला काय म्हणाव ? असा विचित्र प्रकार उत्तरप्रदेश क्या कानपूर मध्ये घडला आहे. या घटनेनंतर पोलीस विभागा प्रती नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.

कानपूरमध्ये ही लाजिरवाणी घटना घडली आहे. कानपूरच्या सचेडी परीसरात राहणाऱ्या एका दाम्पत्याची मुलगी त्याच्या दोन भावांसोबत गुरूवारी जत्रा पाहायला गेली होती. जत्रा पाहुन घरी परतत असताना दोन तरूण बाईकवरून तिच्याजवळ आले. या तरूणांनी मुलीची छेड काढायला सुरुवात केली होती. या छेडछाडीनंतर तरूणांनी तिला एका प्लांटमध्ये नेत तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तरूणांनी पळ काढला होता.

या घटनेनंतर मुलीची कशीबशी भेट तिच्या आईशी झाली. त्यानंतर पीडितेने हा संपूर्ण घटनाक्रम आईला सांगितला होता.यानंतर आईने पीडितेसोबत पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कानपूर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर माय लेकींनी पोलिसांना बलात्काराची तक्रार दाखल करण्याची माहिती दिली. या माहितीनंतर पोलिसांनी ‘आता छेड काढल्याची तक्रार दाखल करून घ्या आणि कोणाला सांगू नका बलात्कार झालाय’. नाहितर तुझी बदनामी होईल आणि तुझ्याशी कुणी लग्न करणार नाही. आणि ही लोक 3 महिन्यांची सुटतील, असा अजब सल्लाच पीडितेला पोलिसांनी दिला आहे.

पीडितेच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, पोलिसांनी बलात्कार प्रकरणात एफआयआर दाखल करण्याऐवजी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. शुक्रवारी सकाळीही आई आणि मुलगी पोलिसात जाऊन आणि बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यास सांगितले होते. पण पोलिसांनी दोन मुलांना ताब्यात घेतल्याची माहिती दिली होती. आणि बलात्काराबद्दल कुणालाही सांगू नका. मेडिकल करून द्या.. आता छेड काढल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मेडिकलनंतर गुन्ह्याचे कलम वाढवू असे पोलीसांनी सांगितले होते.

या प्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुलीच्या वडिलांनी यापूर्वी रात्री विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. आता त्यांच्यावर बलात्काराचा आरोप होत आहे. वैद्यकीय अहवाल येऊ द्या, त्यानंतर कलम वाढवले ​​जाईल, असे पोलिसांना सांगितले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close