नाव लपवून प्रेम ,सेक्स आणि पैशे उकळले
ब्लॅकमेल करत 6 लाख घेतले . लग्नाबद्दल विचारताच धर्म परिवर्तन करण्याची ठेवली अट
संबल (युपी) / नवप्रहार न्यूज नेटवर्क
स्वतःची ओळख लपवून नाव बदलून हिंदू मुलींना प्रेमात ओढून त्यांच्या सोबत शारीरिक संबंध ठेवून त्याची चित्रफीत बनवत मुलींना ब्लॅककेल करण्याच्या किंवा त्यांच्यावर धर्म परिवर्तनासाठी दबाब टाकण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अश्या प्रकरणात धर्म परिवर्तन करणे किंवा मग आत्महत्या या शिवाय मुलींकडे दुसरा पर्याय उरत नाही. नोएडा येथे काम करणाऱ्या मुक्तीसोबत देखील असाच प्रकार घडला आहे. या प्रकरणाला घेऊन हिंदुत्ववादी संघटन आक्रमक झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहीती नुसार युपीच्या उन्नवमधील मोरवा येथे राहणारी एक मुलगी नोएडामधील एका कंपनीत काम करत होती. चार वर्षा पूर्वी तिला उत्तर प्रदेशमधील संभल जिल्ह्यातील एका तरुणांने आपली ओळख बदलून प्रेमात फसवले. त्यानंतर तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून फोटो व व्हिडिओ रेकॉर्डिंग केला. तिला ब्लॅकमेल करत तिच्याकडून हळूहळू सहा लाख रुपये लंपास केले. तरुणीने त्याला लग्नाचे विचारल्यावर त्याने तिला धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला. तो तरुणीला जीव मारण्याची धमकी देऊन लागला.
धर्मांतर बद्दल ऐकून मुलीला आश्चर्य वाटले तिच्यासोबत झालेली फसवणूक तिच्या लक्षात येताचय तिने मुलाबद्दल संभल येथे जाऊन चौकशी केली. तेव्हा तिच्या लक्षात आले की, या तरुणाचे नाव अनुराग नसून जैद अली आहे. तो संभलच्या चंदौसी तालुक्यामधील बनियाठेर पोलीस स्टेशन हद्दीमधील नरौली गावाचा रहिवासी आहे. तरुणीने नरौली पोलीस चौकीत जाऊन या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना दिली.
त्यावेळी तेथे सीओ डॉ. प्रदीप सिंह आणि बनियाठेर पोलीस स्टेशनचे अधिकारी आले होते. हिंदूत्ववादी संघटनेच्या लोकांनी लवजिहाद या प्रकरणा खाली कारवाई करण्याची मागणी केली. कारवाई होत नसल्याचे पाहून ते पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संतप्त झाले. त्यानंतर त्यांनी पोलीस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. या गोंधळाची माहिती अप्पर पोलीस अधिकारी श्रीचंद्र यांना मिळताच ते चौकीत पोहोचले, त्यांनी कारवाईचे आश्वासन देऊन गोंधळ शांत केला.घटनेची माहिती मिळताच हिंदूत्ववादी संघटनेचे लोक नरौली पोलीस चौकीत पोहोचले
रात्री उशिरा या मुलीच्या तक्रारीवरून बनियाठेर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध लवजिहादचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी विरुद्ध गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तरुणीच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल