क्राइम

भाजपा आमदाराने गोदामात नेऊन बलात्कार केला : अन्य व्यक्ती सोबत ठेवायला लावले संबंध 

Spread the love

या घटनेचा व्हिडीओ बनवल्याचा आरोप 

रामपूर ( कर्नाटक ) / नवप्रहार डेस्क 

                  एका महिलेने भाजपा आमदारावर गंभीर आरोप केल्याने कर्नाटक चे राजकारण ढवलून निघाले आहे. महिलेने केलेल्या आरोपा नुसार आमदाराने  ‘मला गोदामात नेऊन बलात्कार केला. अत्याचाराचा व्हिडीओ शूट केला. तो व्हायरल करण्याची धमकी देत अनेकदा बलात्कार केला. माजी नगरसेविकेच्या पतीसोबत संबंध ठेवायला लावून व्हिडीओही करायला लावला”,

या प्रकरणात पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून भाजपा आमदार मुनीरत्न नायडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.आमदार मुनीरत्न नायडू यांच्याबरोबर विजय कुमार, सुधाकर, किरण कुमार, लोहिता गोवडा, मंजुनाथ आणि लोकी या सहा व्यक्तिविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींनी गुन्हेगारी कटात मुनीरत्न यांना मदत केल्याचा आरोप आहे.

दोन वर्षात अनेकदा बलात्कार

कर्नाटकातील रामनगर जिल्ह्यातील कग्गलीपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४० वर्षीय पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, २०२० ते २०२२ या काळात आमदार मनीरत्न यांनी अनेकदा बलात्कार केले. त्याचबरोबर महिलेचा इतर लोकांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी केला. एचआयव्ही असलेल्या व्यक्तीसोबत संबंध ठेवून त्याचा व्हिडीओ तयार करायला लावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आमदाराकडून न्यूड कॉलची मागणी

कोविड काळात माजी नगरसेविकाच्या माध्यमातून पीडित महिलेने ५ हजारांहून अधिक मास्कचा पुरवठा केल्याचे कळल्यानंतर आमदार मनीरत्न नायडू यांनी भेटायला बोलावले. त्यानंतर आमदार मनीरत्नने मेसेज पाठवण्यास सुरवात केली. आमदार मनीरत्न महिलेला दिवसभरात दहा वेळा व्हिडीओ कॉल करायला लागले. त्यानंतर त्यांनी निर्वस्त्र व्हायलाही सांगितले. पण महिलेने त्याला नकार दिला, असे तक्रारीत म्हटले आहे.

काही दिवसानंतर आमदार मनीरत्न नायडू यांनी पीडित महिलेला भेटायला बोलावले. महिलेला गोदामात नेले आणि मिठी मारली. राजकारणात हे सगळे चालते, असे ते म्हणाले. पण, महिलेने विरोध करताच मनीरत्न यांनी महिलेला गुन्हा दाखल करण्याची धमकी देत बलात्कार केला.

‘ते’ व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, आमदाराने व्हिडीओ रेकॉर्ड केले. फोटो काढले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केले. आमदारने हे व्हिडीओ मला टीव्हीवर दाखवले तेव्हा मला धक्काच बसला असे पीडितेने म्हटले आहे.

पीडितेने आमदार मुनीरत्न नायडू यांना व्हिडीओ आणि फोटो डिलीट करण्याची विनंती केली. पण, मी जे सांगेन ते ऐकले तरच व्हिडीओ डिलीट करेन असे आमदार महिलेला म्हणाले.

माजी नगरसेविकेच्या पतीसोबत संबंध ठेवायला पाडले भाग

पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, मुनीरत्न यांनी मला माजी नगरसेविकेच्या पतीसोबत संबंध ठेवायला भाग पाडले. त्याचा व्हिडीओ केले. सीक्रेट कॅमेरे लावण्यात आलेल्या एका अपार्टमेंटमध्ये या व्यक्तीला आणि एका महिलेलाही घेऊन जाण्यास सांगितले. महिला आणि तो व्यक्ती संबंध ठेवत असताना मुनीरत्न ते लॅपटॉपवर पाहात होते आणि त्यांनी ते व्हिडीओही सेव्ह करून ठेवले, असे पीडितेने म्हटले आहे.

पीडितेने तिचे व्हिडीओ डिलिट करण्याची विनवणी आमदार मुनीरत्न यांच्याकडे केली. तेव्हा तुझ्या पतीला आणि मुलांना हे व्हिडीओ दाखवेन अशी धमकी दिली. आमदार मुनीरत्न यांनी ज्या व्यक्तींसोबत संबंध ठेवायला भाग पाडले, त्यांची नावेही तक्रारीत महिलेने घेतली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close