टाकळी जहांगीर येथे महाराजांची जयंती तिथी प्रमाणे साजरी
टाकळी जहांगीर / प्रतिनिधी
अमरावति जवळ असलेल्या टाकळी जहागीर या गावात जाणता राजा मित्र मंडळ व समस्त गावकरी मंडळी टाकळी जहागीर यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली सदर जयंती दरम्यान गावातून भव्य रॅली काढण्यात आली दिंडी, डी जे, बांजो, विविध महापुरुषाचे देखावे हे रॅली चे मुख्य आकर्षक होते तसेच तेजस लिंगोट या युवकाने छत्रपती शिवाजी यांची वेशभूषा स्वीकारून लोकांचे आकर्षनाचे केंद्र ठरला या मिवणुकीदरम्यान गावातील सर्व धर्माचे लोक एकत्र येवून ही शिवजयंती साजरी करतात हे महत्वाचे यामुळे गावाकडून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात येतो या मिवणुकीदरम्यान युवकांचा सहभाग मोठया प्रमाणावर होता तसेच इतर गावातून ही मोठया प्रमाणावर लोकांची गर्दी होती सदर मिरवणुकीत चे आयोजन जाणता राजा मित्र मंडळ टाकळी जहागीर व समस्त गावकरी मंडळी टाकळी जहागीर यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे करण्यात आले तसेच गावातील सर्व धर्माचे युवकांनी पुढाकार घेऊन मिरवणुक यशस्वी करण्याकरिता अथक प्रयत्न केले तसेच पोलीस स्टेशन नांदगांव पेठ येथील ठाणेदार श्री काळे साहेब व त्यांचे कर्मचारी यांनी सुद्धा मिरवणुक शांततेत पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले