माजी आ.राजू तिमांडे यांची गारपीट ग्रस्त भागाला भेट
जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार नुकसान भरपाई देण्याची मागणी
आर्वी / प्रतिनिधी
दि. 15 तारखेला झालेल्या वादळी पाऊस व गारपीटीमधे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले. अक्षरश शेतकरी हवालदिल झाला आहे.
याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार मा.प्रा.श्री. राजुभाऊ तिमांडे यांनी कारंजा तालुक्याचा आज दौरा करून पाहणी केली. त्यांनी आज प्रत्यक्षपणे कारंजा येथील शेतकरी श्री. राजेश काळबांडे यांचे शेतात जाऊन झालेल्या संत्रा चे नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी श्री. अरुण चापले, श्री. अंकुश एकापुरे हजर होते.
त्यानंतर विश्राम गृह कारंजा पत्रकार परिषद घेऊन झालेल्या शेतीमालाच्या नुकसानीची व्यथा मांडली. शेतातील एक टोपली संत्री सोबत आणुन प्रत्यक्ष पणे पुरावा दाखविला. तिच संत्राची टोपली दि. 20 तारखेला प्रत्यक्षात मा. जिल्हाधिकारी, वर्धा दाखवुन शेतक-यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करणार आहे.