विशेष

अवध्या 26 सेकंदात  सात इमारती पत्त्याप्रमाणे कोसळल्या

Spread the love

हिमाचल प्रदेश / नवप्रहार मीडिया 

             मागील दिवसात हिमाचल प्रदेश मध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे भूस्खलनाच्या अनेक घटना घडल्या आहेत. ज्यात अनेक लोकांचा जीव गेला आहे. दरम्यान कुल्लू येथील अनी बसस्थानकाजवळील सुमारे सात इमारती पत्त्यांप्रमाणे कोसळल्या आहेत. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.

अवघ्या 26 सेकंदात 7 बहुमजली इमारती एकामागून एक कोसळल्या. सततच्या पावसामुळे या इमारतींना भेगा पडल्या होत्या. यानंतर नागरिकांना तीन दिवस अगोदर बाहेर काढण्यात आले होते. गुरुवारी या 7 इमारती कोसळल्याकुल्लू जिल्ह्यातील अनी बसस्थानकाजवळ सकाळी 9.15 वाजता ही घटना घडली. अनीचे एसडीएम नरेश वर्मा यांनी सांगितले की, पाच दिवसांपूर्वी या इमारतीत भेगा पडल्या होत्या. नागरिकांना आधीच सुरक्षित बाहेर काढल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

अनेक इमारती कोसळल्याने इतर इमारतींना धोका निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. घटनास्थळी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहनही केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close