Uncategorized

२ हजाराची लाच स्वीकारताना सहा. अभियंत्यास अटक 

Spread the love
वर्धा / प्रतिनिधी 
            ऑनलाइन नेट मीटरिंग आणि विद्युत पुरवठा सुरू करून देण्यासाठी लाच मागणे सहा अभियंता , म. रा. वि. वि. बोरगाव धांदे यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. लाच स्वीकारताना त्यांना एसीबी ने रंगेहाथ अटक केली आहे.
               एसीबी ने प्रसिद्ध केलेल्या प्रीत नोट नुसार  यातील तक्रारदार यांचा सोलर पॅनल लावून देण्याचा व्यवसाय असून त्यांच्या ग्राहकाच्या घरी  सोलर पॅनल असून सुद्धा आलोसे यांनी ऑनलाईन नेट मिटरिंग न केल्याने तक्रारदार यांच्या ग्राहकाला इलेक्ट्रिक बिल जास्त येत आहे. तशी तक्रार करून सुध्दा आलोसे मधुसूदन पेठे पद – सहायक अभियंता यांनी तक्रारदार यांचे ग्राहकाचे  ऑनलाईन नेट मीटरींग  तसेच  विद्युत  पुरवठा  सुरळीत करून देण्यासाठी 3500/- रुपये मागणी केली. तक्रारदार यांनी त्रासाला कंटाळून दि.24/04/2025 रोजी ला.प्र. वि. वर्धा येथे तक्रार दिली. प्राप्त तक्रारीवरून दि. 24/04/2025   रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान आलोसे यांनी तडजोडीअंती लाच रक्कम 2000/- रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली त्यावरून आज दि. 24/04/2025 रोजी सापळा कारवाई दरम्यान आलोसे यांनी त्यांचे कार्यालयातच पंचासमक्ष 2000/- रुपये लाच रक्कम स्वतः स्वीकारली. आलोसे यांना कायदेशीररित्या ताब्यात घेऊन पो. स्टे. वर्धा शहर येथे भ. प्र. का. कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आलोसे यांचे घरची घरझडती कार्यवाही सुरु आहे. आलोसे यांचे मोबाईल फोन ताब्यात घेण्यात आले असून  मोबाईल पडताळणी पंचनामा करून पुढील तपास करण्याची ताजवीज ठेवली आहे.
               सदर कारवाई डॉ.श्री दिगंबर प्रधान ,पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर, श्री. सचिन कदम, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नागपूर परिक्षेत्र. श्री संजय पुरंदरे*,
अपर पोलीस अधीक्षक ला. प्र. वि. नागपूर परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनात
 संदीप मुपडे, प्रभारी पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वि. वर्धा यांनी केली. या चमूत पो.नि. अरविंद राऊत, स.फो. मंगेश गँधे, पोहवा प्रशांत वैद्य, पो.ना.पंकज डहाके, पंकज टाकोणे, राखी फुलमाळी, शीतल शिंदे, पो. अ. प्रीतम इंगळे, लक्ष्मण केंद्रे, प्रशांत मानमोडे, गणेश पवार, मनिष मसराम, विनोद धोंगडे यांचा सहभाग होता.
What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close