भाववाढीच्या आशेणी शेतक-यांचा कापुस घरातच संग्रहीत
कापुस कुजल्याणी खाज बिमारीला अवतन खाजेची बिमारी वाढली.

घाटंजी तालुका प्रतिनीधी / सचिन कर्णेवार
यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुका पांढ-या सोन उत्पादणात अग्रेसर असुन कॉटन सिटी म्हणुन गावाच नाव लौकीक आहे. दिपावली च्या जवळपास या भागातील शेतकरी कापुस नम्मेच्या वर प्रमाणात विक्री करतो पण, मागिल वर्षीचे कापसाचे भाव पाहता यंदाही भाववाढ होईव या कोरड्या आशेवर यंदा ब-यास शेतक-यांणी आपला शेतातील कापुस पिटाला चिमटी घेत भाववाढ होईल या आशेणी न विकता घरी भरुन ठेवला. मार्च महीना अर्धा संमाप्तीस आला तरी कापुस भाववाढ न होता ऊलट भाव कमीच होत असुन आता संचय कापसाची किंमत व वजन कमी होत असुन शेतक-यांच्या आशावर पाणी फिरत आहे. संचईत कापसाणी आता परेशाणी व कापुस कुजल्यासारखा झाल्याणी खाजेच्या बिमारीत वाढ होतांणा दिसत आहे. कापसाला हात लावताच त्वचेला लालसर पणा येणे व खाज होणे हे प्रमाण वाढत असुन कमी किंमतीत कापुस विक्री करणे याशिवाय शेतकरी वर्गावर आता पर्याय उरला नाही. आता शेवटी तरी भाववाढ होईल का? या आशेवर विर्जण येत असल्याचे तालुक्यातील शेतक-यातुन सुर निघत आहे.