निम्मं पैनगंगा प्रकल्प बाबत बिडीओ व तहसिलदार यांनी गावकऱ्यांना संमतीच्या ठराव देण्यावर दबाव टाकू नये!
गावकऱ्यांनी केली जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी.
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
निम्न पैंनगंगा प्रकल्प हा आमचा जीवन मरणाचा प्रश्न आहे त्यामुळे संमतीच्या ठरावासाठी बिडीओ आणि तहसीलदार यांनी दबाव टाकू नये यासाठी त्यांना कडक शब्दात समज द्या! अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे गावाकऱ्यांनी केले आहे.निम्न पैंगगंगा प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून शासनास भुसंपादनआणि पुनर्वसनासाठी ग्रामस्थांचा संमती असल्याचा ठराव आवश्यक असल्याने प्रशासनाकडून ठरावासाठी ग्रामस्थांवर दबाव तंत्राचा वापर वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.घाटंजी तालुक्यातील बिलायता,गावात अध्याप पार्यंत कुठली नोटीस अथवा कुठलाही अधिकारी गावांमध्ये येऊन प्रकल्पाच्या बाबतीत कुठलीही माहिती दिलीगेली नाही असे गावऱ्यांच म्हणणे असून बिलायता गाव आदिवासी क्षेत्रामध्ये येत असून पेसा ऍक्ट 1996 च्या कायद्यानुसार विशेष अधिकार प्रदान करण्यात आलेले आहे. अनुसूचित क्षेत्रामधील कुठली जमीन विकास कामासाठी किंवा पुनर्वसनासाठी संपादित करण्यापूर्वी ग्रामसभा घेऊन सोबत विचार विनिमय करणे बंधनकारक असताना शासनाने ग्रामस्थांना विश्वासात घेतले नाही.
भुसंपादन कायदा 2013 कलम 41 नुसार अनुसूचित क्षेत्रामधील जमिन संपादीत करता येत नाही.
शासनाला जास्तच निकड असल्यास कलम 41/3 नुसार ग्रामसभेची परवानगी घेणे बंधनकारक असून सुद्धा शासन स्थरावरून ग्रामसभेचे आयोजन न करता परवानगी घेतलेली नाही. परंतु गटविकास अधिकारी, पंचायत समिती घाटंजी व तहसीलदार घाटंजी हे बिलायता ग्रामसभेची प्रकल्पाला संमती असल्याचा ठराव मागून वारंवार दबाव तंत्राचा वापर करत दबाव टाकत असल्याचे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात बिलायता येथील गावकऱ्यांनी यवतमाळ ला दिलालेल्या निवेदनाची माहीती दिली आहे.
निवेदनाद्वारे गावाकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना विनंती केली की,आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण व संबंधित अधिकारी गावात येऊन प्रकल्पा बाबतची संपूर्ण माहिती आणि भुसंपादन व पुनर्वसन यासंबंधित शासनाचा जी.आर गुपित न ठेवता तो ग्रामसभेत वाचून दाखवावा त्यामुळे जर गावाकऱ्यांचे समाधान झाल्यास आम्ही गावकरी पुढील निर्णय घेऊ. तत्पुरवी आमच्या गावात आमच्या संमती शिवाय कुठलेही कामे करन्यात येऊ नये अन्यथा याचा वाईट परिणाम होईल असा ईशारा गावकऱ्यांनी निवेदनातून दिला आहे.निवेदन देतेवेळी ग्रामपंचायत खडका बिलायता सरपंच श्री हनमंतू व आडे,ग्रामपंचायत सदस्य सुनील नगराळे,अंकुश लोहकर,कैलास उखले सह इतरही ग्रामस्थ उपस्थित होते .