राजकिय

अखेर छत्तीसगड मध्ये भाजपाला मुख्यमंत्री मिळाला

Spread the love

साय यांच्या नावावर शिक्कामोर्तब 

विष्णुदेव साय छत्तीसगड चे नवे मुख्यमंत्री

 छत्तीसगड / नवप्रहार मीडिया 

                  विधानसभा निकालानंतर छत्तीसगड चे मुख्यमंत्री कोण ? यावर अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते.  जसजशी वेळ निघत होती तसतशी जनतेची उत्कंठा वाढत होती. अखेर निकालानंतर आठव्या दिवशी राज्य भाजपा कार्यालयात विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत साय यांच्या नावाची राज्याचे मुख्यमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली.

भाजपचे निरीक्षक अर्जुन मुंडा, सर्बानंद सोनोवाल आणि दुष्यंत गौतम यांनी आज (दि.१०) दुपारी रायपूरमध्ये भाजप विधीमंडळ पक्षाची बैठक घेतली. छत्तीसगड भाजपचे प्रभारी ओम माथूरही या बैठकीला उपस्थित होते. अखेर आदिवासी नेते विष्णुदेव साय यांच्‍या नावावर शिक्‍कामाेर्तब केले आहे.  यावेळी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, अर्जुन मुंडा आणि दुष्यंत कुमार गौतम यांच्याशिवाय छत्तीसगड भाजपचे प्रभारी ओम माथूरही उपस्थित होते.

केंद्रीय निरीक्षक सकाळी नऊच्या सुमारास रायपूरला पोहोचले. दुपारी १२ वाजल्यापासून मुख्यमंत्र्यांच्या नावावरून आमदारांसोबत विचारमंथन सुरू झाले. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नावावर अखेर शिक्‍कामाेर्तब झाले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close