क्राइम

भावाच्या जागेवर परीक्षा देणाऱ्या पीएसआय ला अटक 

Spread the love
9 वर्षांनंतर गुन्हा उघडकीस
पुणे / विशेष प्रतिनिधी
         भावाला पोलिस करण्यासाठी एक पीएसआय भावाच्या जागेवर परीक्षेला बसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्याने पोलिस दलात खळबळ माजली आहे. घटना २०१६ ची आहे. नऊ वर्षानंतर गुन्हे शाखेला प्रकरण उघडकीस आणण्यात यश आले आहे.
  त्याने भावाला लेखी परीक्षेत पासही करुन दिले. परंतु, त्यांच्याविषयी तक्रार झाली. त्यातून डमी उमेदवार बसल्याने गुन्हा दाखल झाला. त्यामुळे दोघेही फरार झाले होते. अशा प्रकारे पोलीस भरतीत गैरप्रकार केल्याबद्दल ९ गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्याने परीक्षा देऊन ती पास होऊन तो पोलीस उपनिरीक्षक झाला. भावाला पोलीस करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षकाने लेखी परीक्षा दिली होती. ९ वर्षाने हा प्रकार उघडकीस आणण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या पोलीस उपनिरीक्षकाला अटक केली आहे.
सुप्पडसिंग शिवलाल गुसिंगे (रा. कौचलवाडी, रोहिलागड, ता. अंबड, जि. जालना) असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. त्याचा भाऊ गजानन शिवलाल गुसिंगे याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तोतयेगिरी, फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, कट रचणे, तसेच परीक्षांमधील गैरप्रकारास प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर २४ एप्रिल २०१६ रोजी पोलीस भरती प्रक्रियेंतर्गत लेखी परीक्षा पार पडली होती.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close