Uncategorized
भांगेच्या गोळ्या, मद्य पाजून 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर कार मध्ये सामूहिक बलात्कार


मिरा-भाईंदर /विशेष प्रतिनिधी
मित्राच्या विश्वासाला बळी गेलेल्या 14 वर्षीय तरुणीवर मित्र आणि मित्राच्या मित्राकडून कार मध्ये अत्याचार करण्यात आला आहे. तिला कार मध्ये बसवून कमी वर्दळीच्या ठिकाणी नेण्यात आले. त्यानंतर तिला भांगेच्या गोळ्या देण्यात आल्या. पण ती शुद्धीत असल्याचे लक्षात येताच तिला मद्य पाजण्यात आले.शुद्ध हरपल्यावर तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करण्यात आला.यापूर्वी पालिका मुख्यालयात अल्पवयीन कर्मचाऱ्यावर अत्याचाराचा प्रकार घडला होता. त्यानंतर आता भररस्त्यावरील या घटनेमुळे संपूर्ण शहर सुन्न झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिरा रोड परिसरात कुटुंबीयांसोबत राहणारी ही अल्पवयीन तरुणी 5 जानेवारीच्या रात्री तिच्यामित्राच्या विश्वासाला बळी पडली. 21 वर्षीय सलमान खान याने तिला चारचाकी वाहनात बसवून बळजबरीने एल.आर. तिवारी कॉलेज रोड या कमी वर्दळीच्या ठिकाणी नेले. त्याच्यासोबत त्याचा 24 वर्षीय मित्र सरदारजी देखील उपस्थित होता. त्यानंतर वाहनातच अमानुष अत्याचार सुरू झाला. प्रथम पीडित तरुणीला जबरदस्तीने भांगेच्या गोळ्या सलमान व त्याच्या मित्राकडून खायला घालण्यात आल्या. मात्र, तरीही ती शुद्धीत असल्याचे लक्षात येताच आरोपींनी तिला मद्य पाजून पूर्णपणे बेशुद्ध केले. शुद्ध हरपल्यानंतर, दोन्ही आरोपींनी आळीपाळीने तिच्यावर चारचाकीतच अत्याचार केला.
या अमानवी कृत्यानंतर धैर्य एकवटत पीडितेने घडलेला सारा प्रकार आपल्या कुटुंबीयांना दुसऱ्या दिवशी सांगितला. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांकडून मिरा रोड पोलिस ठाण्यात मंगळवारी तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी तत्काळ हालचाली करत बाललैंगिक अत्याचारासह गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदववला होता. त्यानंतर त्यांनी शोध घेत, बुधवारी दुपारी दोन्ही आरोपींना अटक केली.
दरम्यान, मिरा-भाईंदर महापालिका मुख्यालयात अत्याचाराची घटना ताजी असतानाच, आता भर रस्त्यावर घडलेला हा प्रकार शहरातील महिलांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करतो आहे. या घटनेमुळे मिरा-भाईंदरमधील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसंच खरंच महिला आणि मुली शहरात सुरक्षित आहेत का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.१
| Cookie | Duration | Description |
|---|---|---|
| cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
| cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
| cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
| cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
| cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
| viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |
No WhatsApp Number Found!



