भंडारा नगरीत दुमदुमला राजा भोज चा जयघोष
भंडारा / प्रतिनिधी
भारतीय पोवार संघ भंडारा तरफे भंडारा शहरात प्रथमच रविवारी 18 फेब्रुवारी ला राजाभोज बाईक रैली भव्य दिव्य प्रमाणात काढ़न्यात आली.या रैलीत खुप मोठ्या प्रमाणात पोवार पुरुष तसेच महिला मंडलानी सहभाग घेतलेला होता.ही रैली शास्त्री नगर इथून संपूर्ण भंडारा नगर भ्रमण करीत वैनगंगा नदी छोटा पूल कारधा येथे पोहोचली. वैनगंगा नदीच्या तटावर पोवार समाज भंडाराच्या वतीने सामूहिक गंगा आरती करण्यात आली.सदर राजाभोज बाईक रैलीत अध्यक्ष मयूर बिसेन ,प्रमुख उपस्थितित माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे, डॉ.राजदीप चौधरी, डॉ.मनोज चव्हाण, डॉ.विनय रहांगडाले, डॉ.प्रशांत कटरे, डॉ.मंगेश रहांगडाले,चेतन भैरम,प्रकाश रहांगडाले,विजय पारधी होते।
रैलीचे यशस्वी नियोजनात राजेंद्रप्रसाद पटले,चंद्रशेखर रहांगडाले,गणेश पारधी,ललित बिसेन,सौ प्रमिंद्रा पटले,सुरेश टेंभरे,ओझल शरणागत,रवि अंबुले,हिमाचल पटले,मिताराम बिसेन,पन्नालाल राने,बसंत बिसेन, एड.जयंत बिसेन, वामेनद्र रहांगडाले, मुन्नाभाऊ रहांगडाले,सतीश तुरकर,योगेश बिसेन,स्वप्निल अमुले,राहुल पारधी,आदित्य शरणागत यानी विशेष हातभार लावला.