सामाजिक

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानप्रकरणी भंडारा जिल्हा काँग्रेस आक्रमक.

Spread the love

 

त्रिमूर्ती चौकात केला निषेध आंदोलन

भंडारा,  केद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी संसदेत केलेल्या भाषणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याप्रकरणी आज प्रातांद्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांच्या आदेशावरून भंडारा येथील त्रिमूर्ती चौकात जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांच्या नेतृत्वात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले.

भंडारा येथील विश्राम भवन परिसरातून ते त्रिमूर्ती चौकापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हातात फोटो घेऊन जोरदार घोषणा देत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आक्रमकपणे आंदोलन केले. “बाबासाहेब का ये अपमान नही सहेगा हिंदुस्थान”, “जय भीम, जय भीमच्या” जोरदार घोषणा यावेळी करण्यात आले.

निवडणुकीपूर्वी – निवडणुकीनंतर आपले महापुरुष आणि देव बदलणे ही भारतीय जनता पक्षाची फॅशन आहे. भारतरत्न डॉ.आंबेडकर यांनी भारतात समतेचा स्वर्ग निर्माण केला, त्यामुळे आम्ही आंबेडकरांचे नाव घेतो आणि घेत राहणार.
सामान्य जनतेला आपले अधिकार आणि हक्क देणाऱ्या संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान कधीच सहन केला जाणार नाही अशी टीका मोहन पंचभाई यांनी केली.

भाजपकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झाला आहे. हा त्यांचाच नव्हे तर संविधान आणि जनतेचा देखील अपमान आहे. बाबासाहेबांनी सर्व समाज घटकातील लोकांना न्याय दिला. जसं आम्हाला वाटतं अपमान झालाय तसं नितीश कुमार, रामदास आठवले आणि सत्तेतील मित्र पक्षांना वाटत नाही का? वाटत असेल तर त्यांनी आंदोलन केलं पाहिजे, रस्त्यावर उतरले पाहिजे. अशी टीका यावेळी प्रामुख्याने उपस्थित पदाधिकात्यांनी टीका केली.

यावेळी प्रामुख्याने मोहन पंचभाई, अँड.शफी लद्दनी, जयश्री बोरकर, धनराज साठवणे, पूजा ठवकर, धनंजय तिरपुडे, पवन वंजारी, विनीत देशपांडे, मनोज बागडे, प्यारेलाल वाघमारे, योगराज झलके, प्रशांत देशकर, राजेश हटवार, गजानन झंजाड, विजय शहारे, विपीन बोरकर, भगवान नवघरे, पंकज उके, नवाब भाई, रामटेके, स्वाती हेडाऊ, सारिका नागदेवे, कुंदा आगासे, स्वाती बोंबले, सुगत शेंडे, आकाश ठवकर, बिट्टू सुखदेवे, श्रीकांत बनसोड, प्रफुल्ल शेंडे, मुलचंद ईश्वरकर, रवी तिरपुडे , शेखर ईश्वरकर, अजय चवळे, संजय सार्वे, पुंडलिक मोटघरे, सोनू कॉटवानी, नंत्थू खंडाईत नरेशचंद्र कावळे,सचिन हिंगे,नरेंद्र रामटेके व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close