केक कापण्याच्या बहाण्याने तरुणीला निर्जन स्थळी नेले आणि …

पुणे / नवप्रहार मीडिया
तरुणीला वाढदिवसाचा केक कापण्याच्या बहाण्याने निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. आणि घटनेची कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. मांजरी परिसरातील नदी पात्रात हा प्रकार घडला आहे. तरुणी अल्पवयीन असून ती महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहे. मुलीच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पालक वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
अनुराग आणि गणेश अशी अत्याचार करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी तरुण हे पीडित तरुणीचे मित्र होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढदिवसाचा केक कापण्याचा बहाणा करून आरोपींनी दुचाकीवरून तरुणीला मांजरी येथील निर्जनस्थळी नेलं.
रात्री परिसरात कुणी नसल्याची संधी साधत आरोपींनी पीडितेवर सामूहिक अत्याचार केला. अत्याचारानंतर आरोपींनी पीडितेला नदीपात्रातच सोडून दिलं. याबाबत कुणालाही सांगितल्यास तुला जीवे मारू, अशी धमकी देखील पीडितेला दिली. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून हडपसर पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.