सामाजिक

देशातील विषमता संपविण्याची ताकत पत्रकारांमध्ये- भदंत श्रीपाद थेरो

Spread the love

 

पत्रकार पोलीस व प्रशासकीय कर्मचाऱ्यांची इफ्तार पार्टी

 

अमरावती (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी सदस्य सामाजिक भान ठेवून पत्रकारिता करीत असतात पुढे जाऊन समाजात सामाजिक एकात्मता व जातीय सलोखा कायम रहावा याकरिता सर्व जाती धर्माच्या धर्मगुरूंना सोबत घेऊन इफ्तार पार्टी सारखे सामाजिक उपक्रम ठरवित असल्याने त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन भदंत श्रीपाद थेरो यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पवित्र महिना रमजान निमित्ताने रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन बुधवार (ता.१९) रोजी शासकीय विश्रामगृह येथील सभागृहात आयोजित करण्यात आले होते.
इफ्तार पार्टीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून भदंत श्रीपाद थेरो, शीख धर्मगुरू ज्ञानी…., मुस्लिम धर्मगुरू ……. उपस्थित होते. इफ्तार पार्टीचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष नयन मोंढे होते. अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण शेगोकार, शहराध्यक्ष अजय शृंगारे, एडवोकेट जिया खान, आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र मुख्य महासचिव मनीष साठे, भीम ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष राजेश वानखडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे महानगरप्रमुख बंटी रामटेके, नरेंद्र बोरकर, डॉ अली अजगर दवावाला, मोहित भोजवानी, समीर अहमद यांच्यासह अन्य मान्यवर विचारपीठावर विराजमान होते.
इफ्तार पार्टीचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रवीण शेगोकार यांनी केले संचालन जिल्हा महासचिव शोएब खान यांनी तर आभार प्रा. राजरत्न मोटघरे यांनी मानले. रोजा इफ्तार पार्टीला सागर तायडे, सागर डोंगरे, स्वप्निल सवाळे,………

 

मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र महिना रमजान निमित्ताने शहरातील विविध ठिकाणी सामाजिक संस्था व राजकीय पक्षाच्या वतीने तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने रोजा इफ्तार पार्टीचे कार्यक्रम आयोजित केले जातात मात्र अमरावती शहरात प्रथमताच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने मुस्लिम समाजातील रोजेदार पोलीस पत्रकार व प्रशासकीय सेवेत असणारा अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी आयोजित करून एकात्मतेचा संदेश दिला आहे पत्रकार संघाचे कार्य वाखाण्याजोगे असल्याचे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे महानगरप्रमुख बंटी रामटेके यांनी केली.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close