नवरा बायकोच्या 14 वर्ष चाललेल्या भांडणासाठी कारणीभूत ठरलेल्या रुग्णालयाला दीड कोटींचा दंड

नवी दिल्ली / नवप्रहार न्यूज नेटवर्क
रुग्णालयाकडून अनेक वेळा शस्त्रक्रिया करतांना किंवा उपचार करताना चुका होत असल्याच्या घटना घडत असतात. त्या चुकीचा परिणाम रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना भोगावा लागतो. अश्याच एका रुगणलायच्या चुकीमुळे नवरा आणि बायकोत रोज भांडण होत होते. चला तर मग जाणून घेऊ या काय आहे हे प्रकरण ?
दिल्लीतील एका दाम्पत्याला मुलं होत नसल्याने त्यांनी कृत्रिम पद्धतीने गर्भधारणा करण्याचे ठरविले आणि त्यासाठी त्यांनी दिल्लीतील रुग्णालय निवडून तेथे पतीचे स्पर्म दिले. पण रुग्णालयाच्या कथित निष्काळजी पणामुळे पती ऐवजी अन्य कोणाचे स्पर्म वापरल्या गेल्याने मुलांचा रक्तगट हा जुळत नव्हता. त्यामुळे त्यांच्यात भांडण होत होते. दोघेही एकमेकांवर संशय घेत होते हा प्रकार गेली 14 वर्षे चालू होता.
२००९ सालचे हे प्रकरण आहे. एका महिलेने जुळ्या मुलींना जन्म दिला. त्या मुली आज चौदा वर्षांच्या आहेत. मात्र मुलींचे रक्तगट हा त्यांच्या पालकांच्या रक्तगटाच्या जेनेटिक ट्रान्समिशनशी जुळत नव्हते. त्यानंतर या मुलींचे डीएनए प्रोफाइलिंग (DNA profile) करण्यात आले. त्यानंतर महिलेचा पती हा त्या मुलींचा बायोलॉजिकल बाप नाही, हे लक्षात आले. हा कुटुंबासाठी मोठा धक्का होता. नवरा बायको एकमेकांवर संशय घेऊन आरोप प्रत्यारोप करू लागले. कुटुंबात तणाव निर्माण झाला.
सातत्याने दोघांमध्ये भांडणे होऊ लागली. त्यानंतर दोघांनीही सामंजस्याने घेत रुग्णालयाच्या निष्काळजीपणाचा आरोप केला. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे आपल्यावर ही वेळ आल्याचा दावा करत या दाम्पत्याने नॅशनल कंझ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशनमध्ये (NCDRC) धाव घेतली. तसेच नुकसान भरपाई म्हणून आपल्याला दोन कोटी रुपये देण्यात यावे, अशीही मागणी केली. त्यावर सुनावणी करताना कमिशनने रुग्णालयातील डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडला आह आणि रुग्णालयाने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही, त्यामुळे रुग्णालयाने या दाम्पत्याला दीड कोटीची नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश दिले.
रुग्णालयांच्या मान्यतेवर प्रश्न
महिलेच्या गर्भधारण प्रक्रियेसाठी तिच्या पतीच्या स्पर्मच्या ऐवजी दुसऱ्याच व्यक्तीच्या स्पर्मचा वापर करण्यात आल्यामुळे नॅशनल कंझ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशननेकडक ताशेरे ओढले आहेत. अशा रुग्णालयांची मान्यता तपासली जावी, असे त्यांनी म्हटले आहे.