हटके

प्रेयसी सोबत कार मध्ये आढळला सरपंच नवरा  मंचर 

Spread the love
प्रेयसी सोबत कार मध्ये आढळला सरपंच नवरा 
निमच ( युपी )/ नवप्रहार डेस्क 

         महिला कुठलेही कष्ट उचलायला तयार असते.ती नवऱ्यावर आणि त्याच्या कुटुंबियांवर जीव ओवळायला तयार असते. पण तिला घरात सवत नको असते. किंवा नवऱ्याचे अनैतिक संबंध नको असते. या दोन गोष्टीत ती कधीच कॉम्परर्माईज करायला तयार नसते. पण नवरा तो नवराच त्याला घरवाली सोबत बाहेरवाली देखील हवी असते. आणि हीच मानसिकता त्याला कधी तरी धोक्यात आणते. या प्रकरणात असेच घडले आहे.

आपल्या पतीचं दुसऱ्या महिलेसोबत अफेअर सुरू असल्याचा संशय महिलेला होताच, पण हॉटेलबाहेर दोघांना एकत्र पाहिलं आणि तळपायाची आग मस्तकात गेली. बायकोनं महिलेची कॉलर पकडली आणि चांगली धुलाई केली.रस्त्यात हा तमाशा सुरू होता आणि लोक मात्र व्हिडीओ काढत राहिले. सरपंच पतीला हॉटेलबाहेर दुसऱ्या महिलेसोबत पत्नीनं पकडलं आणि तिने चांगला बेदम चोप दिला.

या संपूर्ण प्रकारात मात्र पतीवर तोंड लपवण्याची वेळ आली. सरपंच पती अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यासोबत हॉटेलबाहेर गाडीत पकडला गेला. बायकोचा संताप अनावर झाला आणि तिने चारचौघात महिलेची कॉलर पकडून तिला मारहाण सुरू केली. मारहाण करणाऱ्या महिलेचा पती हा नीमचीत जिल्ह्याचा सरपंच आहे. तर दोघांचं अफेयर उज्जैन हॉटेलबाहेर रंगेहात पकडलं.

ही संपूर्ण घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील असल्याची माहिती मिळाली आहे. व्हिडीओमध्ये कारमध्ये सरपंच नवरा आणि त्याची गर्लफ्रेंड बसले होते. एकमेकांकडे प्रेमानं पाहात होते. सगळं काही चांगलं होईल याची आशा होती, मात्र क्षणात सगळं बदललं. तिथे त्या सरपंच नवऱ्याची बायको आली.

पत्नीनं दोघांना कारमध्ये रंगेहात पकडलं. त्यानंतर जे घडलं ते पाहून नवऱ्याला डोक्यावर हात मारण्याची वेळ आली. सरपंचाच्या पत्नीचे म्हणणे आहे की, तिने आपल्या पतीला या नात्यापासून दूर राहण्यासाठी आधीच समजावले होते, ती महिला त्याला ब्लॅकमेल करून पैशांसाठी उज्जैनला बोलावत होती. सरपंचाच्या पत्नीने सांगितले की, त्यांना दोन मुले असून तिने या नात्याला वारंवार विरोध केला होता. या दोघांना रंगेहात पाहून तर तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली.

पोलीस अधिकाऱ्यांनी दोन्ही महिलांना ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र त्यांनी तक्रार नोंदवण्यास विरोध केला आहे. जर दोघांपैकी एकाने जरी तक्रार केली तर लगेच कारवाई करू अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close