राजकिय

तिसऱ्या टप्प्याच्या मतदानापूर्वी शिंदे चा उबाठा गटाला धक्का

Spread the love

 

नाशिक  / नवप्रहार डेस्क 

                          लोकसभेचे रणसंग्राम सुरू असतांना शिवसेना उबाठा गटाला जोरदार धक्का बसला आहे. येथे ठाकरे गटाच्या नेत्याने शिंदे कॅब्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराला वेग आला आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या दोन टप्प्यांचं मतदान पार पडलं आहे.

उद्या सात मे रोजी तिसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीची रंगत शिगेला पोहोचली असतानाच नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का दिला आहे. नाशिकमधील ठाकरे गटाच्या नेत्यानं शिवसेनेत प्रवेश केला आहे.

नाशिकचे ठाकरे गटाचे नेते विजय करंजकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये विजय करंजकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीच्या काळात झालेला हा पक्षप्रवेश शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. विजय करंजकर यांना शिवसेनेमध्ये जिल्हा प्रमुखपद मिळण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये लोकसभेसाठी महायुतीकडून शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटण्यासाठी विलंब झाल्यानं उमेदवाराची घोषणा देखील उशिरा झाली. या जागेवर शिवसेनेसोबतच राष्ट्रवादीनं देखील दावा केला होता. मात्र अखेर नाशिकची जागा शिवसेनेच्या वाट्याला आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मतदारसंघातून पुन्हा एकदा हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विजय करंजकर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे नाशिकमध्ये महायुतीची ताकत आणखी वाढली आहे, मात्र दुसरीकडे ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close