बारी समाजाच्या मुख्य मागण्यांसंदर्भात आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांची भेट…!
बारी महासंघाचे प्रयत्ननाना यश, आज होणार घोषणा
अंजनगाव सुर्जी / मनोहर मुरकुटे
२७ जून २०२४ रोजी विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बारी समाजाच्या मागण्या संदर्भात बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजुभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून तसेच विधान परिषदेचे आमदार प्रवीणजी दटके,जळगांव चे आमदार संजयजी कुटे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या ३० मिनिटात २ वेळा भेटी घेऊन राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले…!
या मागण्यांमध्ये प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश आहे…! ह्यामध्ये
1)पावसाळी अधिवेशनात शासनाने जाहीर केलेले राष्ट्रसंत शिरोमणी श्री रुपलाल महाराज यांचे राष्ट्रीय स्मारक अंजनगाव सुर्जी अमरावती येथे निर्माण करण्यासंबंधीची कारवाई लवकरात लवकर करावी..!
2)बारी समाजाच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक विकासासाठी राष्ट्रसंत श्री रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ जाहीर करावे…!
3) बारी समाजाचे मुख्य पीक पानमळा,पानपिंपरी व मुसळी अशा औषधी पिकांना प्रोत्साहन देण्यासंबंधी लागवडीकरिता अनुदान देणे तसेच पिकविमा व संशोधन केंद्र उभे करून विशेष योजना लागू करावी…!
4) नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने बारी समाजाची पानमळी पानपिंपरी व इतर पिकांची प्रचंड नुकसान झाले त्याचे नुकसान भरपाई देण्यात यावी…!
या मुख्य मागण्यांसह निवेदन देण्यात आले, यावेळी संजुभाऊ गायकवाड, प्रवीण दटके, कुठे यांच्यासोबत अखिल भारतीय बारी समाजाचे नेते श्री रमेशचंद्र घोलप,श्री रमेश डब्बे,श्री अनिल हिस्सल ,श्री रुपेश येऊल, दिनेश भोंडे, मनोहर मुरकुटे, उमेश भोंडे, निलेश ढगे, वृषभ सातपुते व इतर सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते…!
मा.मुख्यमंत्री यांनी बारी समाजांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन दिले. असून त्याची रीतसर घोषणा आज करण्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री दे्वेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्टपने सांगितले त्यामुळे बारी समाजाच्या प्रलंवीत मागण्या पूर्ण होण्याची प्रतीक्षा पूर्ण होणार हे निश्चित असे अखिल भारतीय बारी समाज महासंघाचे राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख मनोहर मुरकुटे यांनी कळविले आहे