जात प्रमाणपत्राचा विषय कायद्याचे चौकटीत बसवून लवकर निर्णय घेणार._उप मुख्यमंत्री ना. फडणविस.
अमरावती / प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडवणीस हे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांना कोळी महादेव जमातीचे नेते
तथा महाराष्ट्र राज्य कृती समितीचे महासचिव उमेश महादेवराव ढोणे व वरील समाजाचे नगराध्यक्षा नगर पंचायत भातकुली योगिता राजू कोलटेके ,सभापती बांधकाम व शिक्षण नगर पंचायत भातकुली शंकर डोंगरे, नगरपंचायत चे गटनेता पुरुषोत्तम खर्चान , नगरसेवक सुनील भोपसे, वंदना जामणेकर, डॉ. हरिराम भांडे, दिनेश खेडकर , अर्चित पारखे, राजेंद्र राणे,गजानन वानखडे, संतोष भांडे, रंगराव ढोरे, परवीन पारखे,आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी. उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देत लवकरच सविस्तर चर्चा करुण जमातीचे जात प्रमाणपत्र चा विषय सोडवावा या मागणीचे निवेदन सोपविले असता उपमुख्यमंत्र्यांनी हा विषय कायद्याच्या चौकटीत बसवून लवकर निर्णय घेतला जाईल असे व्यासपीठावरील वरील शिष्टमंडळाला सांगितले.