हटके

बापरे .. बाप ….! विमानात साप…..

Spread the love

                 पूर्वी सगळ्यात सुरक्षित म्हणून विमान प्रवास समजला जायचा. पण मागील काही काळात विमान प्रवासात अनेक घटना घडत आहेत.काळ परवाच एका प्रवाश्याला विमानाच्या टॉयलेट मधून प्रवास करावा लागला. आता विमानात लगेज च्या ठिकाणी साप आढळला आहे. साप पाहून विमानात प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची तारांबळ उडाली.

 व्हायरल व्हिडिओमध्ये विमान प्रवासामधल्या वादविवादाच्या अनेक घटना समोर येत असतात. कधी सहप्रवाशांमध्ये सीटवरुन हातापायी होते तर कधी विमान कर्मचाऱ्यांशी वादावादी होते.

अशातच विमानातळा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे,ज्यामध्ये बँकॉकहून फुकेतला जाणाऱ्या एअरएशियाच्या देशांतर्गत विमानात एक साप आढळून आला आहे.साप म्हटलं की चांगल्या चांगल्या व्यक्तीची नाकीनऊ उडते. घरात तसेच बाईकमध्ये तर कधी चक्क झोपण्याच्या ठिकाणी साप आढळून आला आहे तसेच फ्लाइटमध्ये साप आढळल्यानंतर अनेक प्रवासी संतप्त झाले तर काही घाबरुन गेले. ही घटना १३ जानेवारी दिवशी घडली आहे मात्र त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत दिसते की, विमानाच्या आत असलेल्या लगेज केबिनजवळ एका साप दिसून आला आहे. साप बाहेर आल्यानंतर सर्व प्रवाशी घाबरलेले दिसत आहेत. काही वेळानंतर एक क्रु मेंबरने आधी सापाला बाटलीत पकडण्याचा प्रयत्न केला अन् तो यशस्वी झाला. सापाला यानंतर एका मोठ्या पिशवीत ठेवण्यात आले आणि विमानाची लॅंडिग होऊ पर्यंत एका कपाटात बंद करुन ठेवण्यात आले.

व्हायरल व्हिडिओ एक्स प्लॅटफॉर्मवरील @mothership या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. सध्या व्हिडिओला हजारोंच्या घरात व्ह्यूज मिळाले असून मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळाले आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close