ब्रम्ही येथे संविधान उद्देशिका भेट देऊन केला मुलाचा नामकरण कार्यक्रम साजरा.
निलेश मेश्राम यांचा अनोखा उपक्रम
पवनी / प्रतिनिधी
पवनी तालुक्यातील ब्रम्ही येथील श्री.निलेश मेश्राम व त्यांच्या पत्नी सौ.सुषमा मेश्राम यांनी आपल्या मुलाच्या नामकरण कार्यक्रम सोहळा साजरा करत कार्यक्रमात आलेल्या सर्व पाहुणे तसेच गावातील नागरिकांना संविधान उद्देशिका देऊन त्यांनी समाजामध्ये संविधानाची जनजागृती करण्यासाठी हा एक अनोखा उपक्रम राबविला. श्री.नीलेश सेवचंद मेश्राम हे अत्यंत सामान्य परिस्थितीत जीवन मान काठून त्यांनी स्वतःला घडवले. ते शाहू ,फुले, आंबेडकर अश्या थोर महापुरुषांच्या विचारधारेवर चालणारे व्यक्तिमत्व आहेत समाजा मध्ये संविधानबाबत जनजागृतीचा उपदेश त्यांनी आपल्या मुलाच्या नामकरण सोहाळ्यात आलेल्या सर्व पाहुणे मंडळीना संविधान उद्देशिका देऊन सन्मानित केले श्री. निलेश मेश्राम यांनी आपल्या मुलाचे नाव नीतांश ठेऊन नामकरणाला येणाऱ्या पाहुण्यांना एक संविधानाची जनजागृती तसेच एक सामाजिक संदेश म्हणून संविधान प्रास्ताविका भेट दिली. त्यांच्या हा उपक्रमामुळे सर्वत्र कौतुकाचा विषय ठरलेला आहे तसेच गावातील पंचशील नवयुवक बौद्ध समाज नवीन आबादी येथील विहार बांधकामाला त्यांचे स्व.वडिलांचे नावाने स्व.सेवचंद मेश्राम यांच्या स्मृती प्रित्यर्थ १० हजार रुपये देणगी देऊन धम्म दान केले आजच्या युगात समाजाप्रती चांगले विचार ठेऊन त्यांनी आपल्या घरच्या कार्यक्रमातून संविधाना विषयी जनजागृतीचा छोटासा प्रयत्न त्यांचे कडून बघायला मिळाले कार्यक्रमाला बाहेरून पाहुणे मंडळी तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.