सिट्रस इस्टेट चांदूरबाजार व तालुका कृषी अधिकारी चांदूरबाजार यांच्या संयुक्त विद्यमाने केले प्रक्षेत्र भेटीचे आयोजन!
चांदुर् बाजार / प्रतिनिधी
आज दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी सिट्रस इस्टेट चांदूरबाजार व तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील संत्रा फळबागांचे कृषी विद्यापीठ अकोला येथील शास्त्रज्ञ मार्फत सर्वेक्षण करून तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना संत्रा फळगळ कारणे व त्यावरील उपाय योजना, विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव त्यावरील उपाय योजना आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सद्यपरिस्थितीत सतत चालू असलेला पाऊस,ढगाळ वातावरण, सूर्यप्रकाशाचा अभाव व त्यामुळे झाडांच्या भौतिक व आंतरिक क्रिया मंदावल्यामुळे फळगळ, कीड – रोगास पोषक वातावरण निर्माण झाल्याने त्याचे व्यवस्थापन व उपाय योजना वेळीच करणे आवश्यक असल्याने “सिट्रस इस्टेट चांदूरबाजार” मार्फत सदर परिस्थितीची दखल घेत शास्त्रज्ञ भेटीचे नियोजन करण्यात आले व तालुक्यातील ब्राह्मणवाडा पाठक,वणी, बेलखेडा, कुरणखेड, घाटलाडकी, ब्राम्हणवाडा थडी, जसापुर, माधान गावातील संत्रा बागाना भेटी देऊन शेतकऱ्यांना संत्रा फळगळ, किडरोग आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी डॉ.राजेंद्र वानखेडे सहयोगी प्राध्यापक,फलोत्पादन कृषी संशोधनकेंद्र ,अचलपूर
डॉ.प्रशांत मगरे सहाय्यक प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र,कृषी संशोधन केंद्र अचलपूर, श्री.अजय गाठे वरिष्ठ संशोधन सहाय्यक,मृदशास्त्र पानवेली संशोधन केंद्र दिवठाणा ,कु एस.एम.नागे वरिष्ठ संशोधक सहाय्यक, वनस्पती कीटकशास्त्रज्ञ,कृषी संशोधन केंद्र अचलपूर,
श्री.एस.पी. दांडेगावकर मुख्य कार्यकारी अधिकारी सिट्रस इस्टेट चांदूरबाजार,
सिट्रस इस्टेट कार्यकारणी सदस्य
श्री.उधवरावजी बंड,श्री.प्रफुल नवघरे,श्री पुष्पक खापरे,
श्री संदीप मोहोड,कुं.दिपाली ढमके तांत्रिक सहाय्यक सिट्रस इस्टेट,संजय कचरे कृषी पर्यवेक्षक,चांदूरबाजार,आशिष मोहोड, कृषी सहाय्यक ब्राम्हणवाडा पाठक,श्रीकृष्ण सांगळे कृषी सहाय्यक, सोनोरी कु.रश्मी पटेल कृषी सहाय्यक घाटलाडकी,गोपाळराव वानखेडे,कृषी सहाय्यक मांधान व मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.