हटके

पाच मुलांचा बाप असलेल्या जिम ट्रेनर च्या प्रेमात पडली तरुणी ; धर्मही बदलला पण …

Spread the love

धर्म बदलून देखील नाव न बद्दलण्या मागे हा होता गेम 

जयपूर  / नवप्रहार डेस्क 

                    प्रेमात पडलेल्या व्यक्तिला ( स्त्री अथवा पुरुष ) दुसरे काहीच दिसत नाही. त्यांना त्यांच्या आयुष्याला घेऊन समजावण्याचा प्रयत्न केला तर तिला अथवा त्याला तो किंवा ते जगातले सगळ्यात मोठे वैरी वाटतात. जयपूर ला गेलेली एक तरुणी एका मुस्लीम तरुणाच्या प्रेमात पडली. या तरूणांचे पहिलेच लग्न झाले होते. आणि तो पाच मुलांचा बाप होता. ही गोष्ट त्याने तिच्यापासून लपवून ठेवली. तिने त्याच्यासाठी धर्मही बदलला पण तिला आता नको तोच त्रास सहन करावा लागत आहे.

मध्य प्रदेशातील हे प्रकरण आहे. जयपूर पोलीस आयुक्तालयात एक महिला रडत आली, प्रतिमा नवंकुर असं तिचं नाव, ती महाराष्ट्रातील रहिवासी आहे. 2020 मध्ये प्रतिमा लॉकडाऊनच्या काही दिवस आधी एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जयपूरला आली होती आणि त्यादरम्यान प्रतिमा तिथंच अडकली. या काळात प्रतिमाने तिथं राहण्यासाठी फ्लॅट घेतला आणि मग जिम जॉईन केली. या जिममध्ये तिची भेट जिम ट्रेनर आरिफ इनायतशी झाली, ज्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं.

प्रेमासाठी धर्म बदलला पण…

प्रेमामुळे प्रतिमाने धर्म बदलला आणि आरिफशी लग्न केलं. आरिफने लग्नापूर्वीच आपल्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तरुणीने केला आहे. यानंतर दोघांनी 18 ऑक्टोबर 2021 रोजी औपचारिकपणे लग्न केलं. आरिफने तिचा धर्म बदलला, तिला बुरखा घालून नमाज पढायला लावू लागला पण तिचं नाव बदललं नाही.

प्रतिमाला नंतर याचं कारण समजले. आरिफने तिची मुंबईतील वडिलोपार्जित मालमत्ता कवडीमोल भावाने विकली आणि पैसे हडप करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला. मुलीच्या म्हणण्यानुसार, पैसे न दिल्याच्या बदल्यात त्याने तिला घटस्फोटाची धमकीही दिली.

प्रमिला सध्या डेंग्यूने त्रस्त आहे. त्यांची अडीच वर्षांची मुलगीही आजारी आहे. मात्र आरिफने तिच्यावर किंवा तिच्या मुलीवर उपचार केले नाहीत. तसंच त्यांना कोणताही खर्च दिला नाही. उपचारासाठी पैसे देण्याऐवजी आरिफ तिच्यावर सतत पैसे उकळण्यासाठी दबाव टाकत होता. आरिफ आधीच विवाहित होता, त्याला पाच मुलं होतं. ज्याबद्दल तिला लग्नापूर्वी काहीच माहिती नव्हती, असं ती म्हणाली.

तरुणीची पोलिसात तक्रार

तरुणीने हवा महलचे आमदार बाल मुकुंदाचार्य यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आपली कहाणी आमदाराला सांगितली. आरिफने कट रचून तिच्याशी लग्न केलं आणि जाणून बुजून नाव बदललं नाही, असा आरोप तरुणीने केला आहे. मुलीला अतिरिक्त आयुक्त कुंवर राष्ट्रदीप यांच्यासमोर हजर करून तक्रार दाखल करण्यात आली.

तरुणीने सांगितलं की, राजकीय प्रभावामुळे तिच्या पतीने तिला शास्त्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवू दिली नाही. इथं आमदार बालमुकुंद सांगतात की, अशाप्रकारे लव्ह जिहाद करून हिंदू मुलींना फसवलं जात आहे, त्यानंतर त्यांचे तुकडे करण्यात आल्याच्या अनेक घटना समोर येतात. या प्रकरणाची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी प्रथमदर्शनी मुलीचे आरोप गांभीर्याने घेत तिला सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close