ब्रेकिंग न्यूज

मध्यरात्री ‘ द बर्निंग लक्झरी ‘ बस चा थरार ; चालकाच्या प्रसंगवधनाने वाचले 22 प्रवाश्यांचे प्राण 

Spread the love
रायगड : नवप्रहार मीडिया
                 मध्यरात्रीची वेळ , लक्झरी बस मधील प्रवासी दिवसभाऱ्याचे थकले असल्याने त्यांना गाढ झोप लागली होती.अश्यातच गाडीचा टायर गरम होऊन फुटल्याने लक्झरी बस ने पेट घेतला. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने सगळ्या प्रवाश्यांना तात्काळ गाडी खाली उतरायला लावले.या गाडीत 22 प्रवाश्यांसह चालक आणि वाहक मिळून 24 लोकं होते. घटना मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या राजेवाडी फाट्याजवळ घडली.
मुंबई गोवा महामार्गावर चालत्या लक्झरी बसने अचानक पेट घेतला पण सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. सगळे प्रवासी गाढ झोपेत असताना चालत्या बसने पेट घेतला मात्र हा सगळा प्रकार चालकाच्या लक्षात आल्याने बसमधील एकूण 22 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
मंगळवारी मध्यरात्री दोन वाजताच्या दरम्यान मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजेवाडी फाट्याजवळ औदुंबर ट्रॅव्हल्सची लक्झरी बस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. औदुंबर ट्रॅव्हल्सची MH 08 9779 क्रमांकाची लक्झरी बस रत्नागिरीवरुन मुंबई येथे निघाली होती. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील राजेवाडी फाट्याजवळ आली असता बसचा टायर गरम होऊन फुटल्याने लक्झरी बसने पेट घेतला.
 आग लागल्याचे चालक गुलशन पठाण याच्या लक्षात येताच लक्झरी बस रस्त्याच्या साईडला घेऊन सर्व प्रवाशांना बस मधून खाली उतरवण्यात आले. यावेळी बस मध्ये दोन चालकांसह 22 प्रवाशी प्रवास करीत होते.
चालकाच्या प्रसंगावधानामुळे लक्झरी बसमधील सर्व प्रवासी बचावले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचेपर्यंत भीषण आगीत लक्झरी बस पुर्णतः जळून खाक झाली. या संपूर्ण घटनेचा अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राठोड करीत आहेत.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close