क्राइम

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत दाऊद करायचा ब्लॅकमेल 

Spread the love

उरण  / नवप्रहार डेस्क

                कथित प्रेमी दाऊद कडून हत्या करण्यात आलेल्या यशश्री शिंदे प्रकरणात पोलिस सूत्रांनी आता नवीन खुलासा केला आहे. त्यांच्या मते दाऊद कडे यशश्री चे आक्षेपार्ह फोटो होते आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत तो तिला भेटायला बोलावत होता. यावेळी तो कर्नाटक मधून तिच्या भेटीसाठीच आला होता. यशश्री त्याला टाळत होती. सूत्रांचे असेही म्हणणे आहे की तो तिला लग्नाची गळ घालत होता आणि कर्नाटक ला चलण्याचे बोलत होता.

पोलिसांनी त्याला कर्नाटकमधून अटक केलीय. दरम्यान, या हत्याप्रकरणी वेगवेगळी माहिती समोर येत आहे. आरोपी दाऊदकडे यशश्रीचे आक्षेपार्ह फोटो होते, असे पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले आहे.

दाऊद करायचा ब्लॅकमेल?

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी दाऊद शेख आणि यशश्री शिंदे हे एकमेकांना ओळखायचे. यशश्री शिंदे दाऊदला भेटायला गेली होती. मात्र त्या दोघांत वाद झाला. शेवटी रागाच्या भरात दाऊदने तिच्यावर चाकूने वार केले आणि यातच यशश्री गतप्राण झाली. हत्येनंतर दाऊद घटनास्थळावरून पळून गेला. त्याने थेट कर्नाटक गाठले. कर्नाटकहून तो केरळमध्ये जाणार होता. मात्र पोलिसांनी त्याचा माग काढत त्याला केरळला पळून जाण्यापूर्वीच कर्नाकटमध्ये पकडले.

दाऊद शेखकडे यशश्रीचे आक्षेपार्ह फोटो?

दाऊद शेख याच्याकडे यशश्रीचे आक्षेपार्ह फोटो होते, असा दावा केला जातोय. मराठी वृत्तपत्र लोकमतने तसे वृत्त दिले आहे. याच आक्षेपार्ह फोटोंच्या मदतीने दाऊद यशश्रीला ब्लॅकमेल करायचा. दाऊद यशश्रीला भेटण्यासाठी उरणला आला होता. 25 जुलै दाऊद आणि यशश्री एकमेकांना भेटले होते. पण याच भेटीत दोघांमध्ये वाद झाले आणि रागाच्या भरात दाऊदने तिची हत्या केली.

यशश्री फोन गायब

यशश्रीची हत्या केल्यानंतर दाऊद घटनास्थळाहून पसार झाला होता. यशश्रीचा मोबाईल फोन गायब आहे. घटनास्थळी तिचा फोन आढळून आलेला नाही. पुरावे नष्ट करण्यासाठी दाऊदने तो लपवला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलीस याच फोनचा शोध घेत आहेत. यशश्रीचा फोन आढळल्यास त्यातून अनेक बाबींचा उलगडा होऊ शकतो. कदाचीत याच फोनमधील चॅटिंग किंवा अन्य संभाषण या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा ठरू शकते.

भेटायला जाऊ नको, मित्राचा सल्ला

दरम्यान, यशश्रीच्या मित्राने तिला दाऊदला भेटायला जाऊ नको असा सल्ला दिला होता. दाऊद हा मानसिक धक्क्यात आहेत. त्यामुले त्याला भेटणे योग्य नाही, असे त्याने यशश्रीला सांगितले होते. पण भेटीतून काही मार्ग निघेन असे यशश्रीला वाटले होते. त्यामुळे ती दाऊदला भेटायला गेली होती. मात्र दाऊदने चाकूने तिची हत्या केली.

:

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close