जिल्हा ओबीसी मोर्चाचा निवडणूक मिशन 2024 मेळावा संपन्न

मेळाव्यामध्ये पदाधिकारी यांना प्रमाणपत्र वाटप
अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे
अमरावती भाजपा ओबीसी मोर्चाचे वतीने नुकताच भाजपाचे कार्यालय
राजापेठ अमरावती येथे भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रविराजजी देशमुख, भाजपा जिल्हा सरचिटणीस अमरावती ग्रामीण नितीनजी गुडधे पाटील, जिल्हा अध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा ॲड पद्माकरजी सांगोळे , विधानसभा प्रमुख गोपालजी चंदन, ओबीसी* मोर्चा लोकसभा प्रमुख जयंतजी आमले
महाराष्ट्र प्रदेश सचिव ओबीसी मोर्चा, निलेशजीदेशमुख, विदर्भ युवा प्रमुख सचिन इंगळे, यांचे प्रमुख उपस्थितीत नुकताच ओबीसी मिशन २०२४ चा भव्य दिव्य असा कार्यक्रम संपन्न झाला, ह्यामध्ये सर्व पदाधिकारी ह्यांना नियुक्ती पत्र देऊन मान्यवरांचे हस्ते सन्मानित करून आगामी मिशन २०२४ ची जबाबदारी सर्व पदाधिकारी ह्यांना देण्यात आली असून, काही महत्वाच्या सूचना सुद्धा करण्यात आल्यात ह्याप्रसंगी कार्यक्रमाचे संचालन संतोष काळे यांनी केले पत्र वाटपाचे वाचनाचे काम आशुतोष गुल्हाने यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वैशाली ताई पिहुलकर यांनी केले.
प्रसंगी ॲड पद्माकर सांगोळे यांनी कार्यक्रमात ओबीसी मोर्चा हा प्रत्येक निवणुकीत महत्त्वाची भूमिका बजावत असतो व आगामी निवडणुकीत सुद्धा ओबीसी मोर्चा हा प्रत्येक घटका पर्यंत पोहचून मिशन २०२४ नक्कीच चार शे पार करेल अशी त्यांनी ग्वाही दिली.