हिरापूरचे नागरिक पाण्यासाठी धडकले जीवन प्राधिकरण चे कार्यालयावर

अंजनगावसुर्जी मनोहर मुरकुटे
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील हिरापूर येथे पाणीपुरवठा नियमित होत नसल्याने हिरापूर येथील नागरिक अंजनगाव सुर्जी येथील जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक दिली असून पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास जन आंदोलनाचा इशारा हिरापूर येथील नागरिकांनी जीवन प्राधिकरण ला दिला आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील हिरापूर हे गाव सातपुड्याच्या पायथ्याशी असून शेवटचे टोक आहे या ठिकाणी जीवन प्राधिकरण चा पाणीपुरवठा होत असून येथील पाणी सोडणारा व्हालमन च्या हेकेखोर वृत्तीमुळे गावातील काही भागात पाणी पुरवठा जास्त तर काही भागात पाच सहा दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने गावातील नागरिकांनी आज जीवन प्राधिकरण अंजनगावसुर्जी येथिल कार्यालयात धडक देऊन हिरापूर येथील संपूर्ण गावात सुरळीत पाणीपुरवठा न झाल्यास जन आंदोलनाचा इशारा दिला आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य अंकुश पाचघरे,रुपेश फरकुंडे,दयानंद मते,सुरज उके,गौरव भिसे,रमेश इश्वरकर,विलास रेहपांडे,प्रतिक भिसे,केशव काळे,राजेंद्र घनमोडे,अरुण घनमोडे,गोपाल फरकुंडे,सुभाष राऊत,अवधुत सहारे,उपस्थित होते.