अल्पवयीन विद्यार्थ्यांवर त्याच वसतिगृहात शिक्षण घेणाऱ्या मुलांकडून अत्याचार

या घटनेकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी वसतिगृह अधीक्षकासह सात विधिसंघर्षित मुलांविरोधात बालकांवर लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत आणि रॅगिंगप्रकरणी इगतपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. मुलांच्या सुरक्षिततेबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही, अशा शब्दात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आश्वस्त केलं आहे.
काय आहे प्रकरण?
दहावीत शिक्षण घेणाऱ्या वसतिगृहातील सात विधिसंघर्षित मुलांनी वसतिगृहातीलच पाचवी ते आठवीच्या वर्गातील मुलांना गुंगीचे औषध देऊन वसतिगृह आवारात त्यांच्याशी वेळोवेळी अनैसर्गिक अत्याचार केला. गेल्या सात महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. वरिष्ठ वर्गातील मुलांच्या भीतीपोटी पीडित मुलांनी या प्रकाराची वाच्यता केली नाही.
वैद्यकीय अधीक्षकांवरही गुन्हा
वैद्यकीय अधीक्षक सुशांत रमेश दूधसागरे यांना पीडित मुलांनी माहिती दिली होती. मात्र, त्यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. या घृणास्पद प्रकाराने इगतपुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. इगतपुरी पोलिस निरीक्षक सारिका आहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक के. पी. भोजने तपास करीत आहेत.

प्रशासनाकडून गंभीर दखल
दरम्यान, वसतिगृहात मुलांवर झालेल्या अत्याचार प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचे प्रभारी अधिकारी डॉ. संजय शिंदे आणि अधीक्षक मदन बडे यांच्यासह सहयोगी कर्मचाऱ्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळास आणि स्थानिक पोलिस स्टेशनला भेट दिली. त्यांनी प्रकरणाची प्राथमिक चौकशीची प्रक्रिया पूर्ण करून जिल्हा परिषदेच्या सीईओंना माहिती सादर केली आहे.