कोनदरी – वाकान येथे आमदार इंद्रनील नाईक यांनी केली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात दिली भेट
प्रतिनिधी / संजय कारवटकर
दिनांक– 21 व 22 या दोन दिवसात 236 मिलिमीटर एवढा प्रचंड पाऊस महागाव तालुक्यात कोनदरी – वाकान येथे पुसद मतदार संघाचे आमदार इंद्रनील नाईक यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन , महागाव तालुक्यांतील प्रशासनाची टीम त्यांच्या सोबत घेऊन प्रत्यक्ष पिकांचे झालेले नुकसान पाहनी केली आहे. आणि गावात जाऊन घरोघर पाणी शिरलं होत अन्नधान्य पुरवठाचे घरात नुकसान झाले होते त्यावर मोठी गंभिर दखल घेतली आणि सम्पूर्ण शेतकऱ्याना मोठा दिलासा दिला गेलं जो तुमच्या पिकांचे नुकसानीचे कारण हे आजूबाजूचे नाले आहे त्या नाल्याना रुंदीकरण देऊ या नंतर तुमचं नुकसान टळेल पुढच्या वर्षी हे नाले रुंदीकरण करण्याची जबाबदारी माझी आहे तूम्ही निश्चिंत रहा. आणि झालेल्या नुकसाभरपाईची तातडीने दखल घेतली जाईल महागाव तालुका सरसकट ओला दुष्काळ जाहिर करु, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही आणि जे तुमचे पाण्यामुळे झालेली घरपडी त्याची दखल घेतली जाईल स्थानिक प्रशासनाला आदेश दिला की लवकरच यांचे कामे मार्गी लावा आणि लवकर आर्थिक मदत सर्वांना मिळेल असा विश्वास या ठिकाण कोंदरी – वाकान वासियांना आमदार इंद्रनील नाईक यांनी दिला आहे गेल्या दोन दिवसाच्या अतिवृष्टी मुळे संपूर्ण शेतकरी हतबल झाले आहे,मध्ये होऊन अतिवृष्टीने हाहाकार माजला निसर्ग कोपला या नैसर्गिक आपत्तीत पशुधन , घरांची पडझड , शेती संसाधनाची , महागाव तालुक्यात कोंदरी वाकान हे गाव डोंगराच्या कुशीत असल्यामूळे चारही बाजूने मोठ – मोठे नाले आहेत आणि दोन तलाव असल्यामूळे त्यांच्या काठी शेतकऱ्यांची शेती आहे सम्पूर्ण अति जास्त प्रमाणात या गावातल्या शेतकऱ्यांची पिके, कापुस, तूर, सोयाबीन, अशी पिके रगडून गेली आहे आणि विहिरी ढासळून पडझड , शेती व शेतमालाचं प्रचंड प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून शेतकरी तूर्तास आर्थिक रित्या पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे शेतशिवाराच्या नुकसानीमुळे तो मानसिकरित्या पूर्णतः खचला असून अशा हताश व हतबल अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहायला हवे या नैसर्गिक आपत्तीत आर्थिक विवेंचनेत असणाऱ्या बाधित शेतकऱ्यांन च्या झालेल्या शेती पिकांची नुकसानीचे पंचनामे तातडीने करून आर्थिक मदत करण्यासाठी आपण तातडीने पाठपुरावा करू राज्य शासनाने कार्यतत्परतेने निर्णय घ्याव ,शेतकऱ्यांच्या पदरात आर्थिक मदत मिळायला हव अशी अपेक्षा महागाव तालुक्यांतील शेतकऱ्याना लागली आहे… यावेळी उपस्थित दौलत नाईक माजी जि.प. उपाध्यक्ष, डॉ.बि.एन चव्हान, जि.प.सदस्य बाळुभाऊ कामरकर ,मधुकर राठोड माजी.संचालक, राजु राठोड शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख महागांव, रवि पवार, सरपंच कोंदरी, संतोष भाऊ राठोड़ उपसरपंच कोंदरी, नरेंद्र जाधव, अनिताताई चव्हान, वाफ भाई, इरफान खान, अशोक जाधव, इंदल राठोड, गुणवंत राठोड, विशाल पवार (जिल्हा सचिव स्वाभिमानी शेतकरी संघटना) आणि गावातील शेतकरी आणि इतर नागरिक उपस्थित होते