आर्णी पं. स. च्या बांधकाम विभागातील अभियंत्याच्या टक्केवारीने बांधकामाची गुणवत्तेची खालावली
एकच अभियंत्याची चौफेर फटकेबाजी
कर्तव्यदक्ष जि प मुख्याधिका-यांनी पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या कामाचा पंचनामा करावा
आर्णी:-यवतमाळ जिल्ह्यातील वादग्रस्त भष्ट्रचा-याने बरबटलेली पंचायत समिती म्हणुन आर्णी पंचायत समितीची ओळख आहे याच पंचायत समितीत मागिल १० वर्षात अनेक शासकीय कर्मचारी लाच घेतांना रंगेहात अटक झाली आहे तरी टक्केवारीचा मलिदा सुटता सुटत नसल्याने आज तागायत सुरुच आहे पंचायत समितीत एकुन दोन अंभियंता कार्यरत होते एकाची बदली होऊन जवळपास एकवर्ष पुर्ण होऊन सुध्दा बदली झालेल्या रिक्त पदावर अद्यापर्यंत कनिष्ठ अभियंता रुजु न झाल्याने त्यामुळे येथे कार्यरत अभियंता हे संपुर्ण आर्णीतील कामकाज करत असुन चौफेर टक्केवारीचा मलिदा लाटत असल्याने गावात सुरु असलेले बांधकामाची कामे निकृष्ठ दर्जाची होत असल्याची गावक-यांची ओरड होत आहे याबाबत गटविकास अधिकारी यांना भेटुन सुध्दा एकच अभियंता असल्याने ते कुठ लक्ष देईल म्हणुन या निकृष्ठ दर्जाच्या कामाला दस्तुरखुद्द गटविकास अधिकारीच त्या अभियंताची पाठराखन करीत आहे त्यामुळे सदर अभियंता पंचायत समितीच्या आवारात सुध्दा येत नाही सकाळी हजेरी लावली की दौरा टाकुन चक्क धाब्यावर कंत्राटदाराची शाळा भरवितो त्यामुळे नविन सिंचन विहीरीच्या प्राकलनावर अंभियंता यांची स्वाक्षरी पाहीजे असल्याने शेतकरी वर्ग आपल्याला आज तरी अभियंता मिळेल म्हणुन दिवसभर त्या अभियंताची वाट बघत त्यांना कुठे शोधावे शेवटी मोबाईल नंबरवर सपंर्क केला तर आता येतो मग येतो नंतर मोबाईल बंद करुन ठेवल्याने दिवस भरापासुन अभियंताची चातका प्रमाणे वाट बघणा-या शेतक-यांना हाताश होऊन घरी परत जावे लागत असल्याने सदर अभियंताना जि प मुख्याधिकारी यांनी सदर अभियंताचाच कार्यालयीन कामकागाचा पंचनामा करावा अशी मागणी तालुक्यातील सिंचन विहीर लाभार्थी यांनी केली आहे