एन एम एम एस शिष्यवृत्ती* *परीक्षेमध्ये मनुताई कन्या शाळेच्या विद्यार्थिनींचे सुयश
अकोला /प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे गेल्या डिसेंबर मध्ये इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना’ एन. एम. एम. एस .परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला .त्यामध्ये स्थानिक मनू ताई कन्या शाळेतील कुमारी गौरी प्रमोद भटकर .व कुमारी गौरी सुभाष भटकर .ह्या दोन विद्यार्थिनी शिष्यवृत्तीस पात्र ठरल्या असून त्यांनी शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे .अतिशय जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केलेले आहे .पात्र ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी चार वर्ष शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे .आणि आणि हा लाभ घेऊन त्या आणखी मेहनत करून शाळेचे नाव उंचावणार आहेत . अशी ग्वाही त्यांनी सर्वांना दिलेली आहे. त्याचप्रमाणे पूर्व उच्च प्राथमिक परीक्षेमध्ये इयत्ता पाचवी मधील कुमारी अर्पिता विजय काळे. व कुमारी श्रावणी स्वप्निल घाटोळ .या विद्यार्थिनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या आहेत. यासाठी संस्थेच्या अध्यक्षा पल्लवीताई कुलकर्णी मॅडम तसेच सचिव विदुला ताई चौधरी मॅडम, संस्थेचे मार्गदर्शक श्री अनिरुद्ध चौधरी सर यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले. शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थिनींचा शाळेच्या मुख्याध्यापिका धारस्कर मॅडम यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ धारस्कर मॅडम. पर्यवेक्षिका मांगे मॅडम व सर्व शिक्षक शिक्षिका यांनी मार्गदर्शन केले. आपल्या यशाचे श्रेय विद्यार्थिनींनी संस्थेच्या अध्यक्षा, सचिव, संस्थेचे मार्गदर्शक मुख्याध्यापिका ,पर्यवेक्षिका सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व आई-वडिलांना दिले.