अंजनगावच्या प्रवीण शेळके यांनी केले माउंट युनम् एवरेस्ट शिखर सर
अंजनगाव सर्जी, मनोहर मुरकुटे
आझादी का अमृत महोत्सवां’तर्गत १५ ऑगस्ट रोजी मायनस ६ डिग्री सेल्सिअसमध्ये अंजनगाव सुर्जी येथील अंबा नगर येथील रहिवासी श्री रमेश राव शेळके यांचा मुलगा व अंजनगाव शहरातील माजी विद्यार्थी प्रवीण शेळके हे पुलगाव येथील इंडियन मिलिटरी स्कूलचे प्राचार्य आहेत स्थानिक पूलगाव येथील इंडियन मिलिटरी स्कूलचे प्रा. प्रवीण शेळके व त्यांचे पाच माजी विद्यार्थी हे हिमाचल प्रदेश येथील हिमालय पर्वतरांगेतील प्रसिद्ध माउंट यूनम (उंची ६,१११ मीटर) शिखर सर करण्यासाठी गेले होते. सहा जणांपैकी शेळके हे शिखर सर करण्यात यशस्वी झाले. विद्यार्थी- शिक्षक मिळून आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्रातील ही एकमेव
मोहीम ठरली.
इंडियन माउंटनेरिंग फाउंडेशन, दिल्लीमार्फत् मान्यताप्राप्त मोहिमेत १० जणांच्या टीममध्ये सहा जण महाराष्ट्र, दोघे हरयाणा, एक जण जम्मू-काश्मीर तर एक मध्य प्रदेशमधील होता. दहा जणांपैकी केवळ चार लोक शिखरापर्यंत पोहोचू शकले. प्रतिकूल वातावरणामुळे माजी विद्यार्थी सागर कुंभारे, प्रवीण मांजरखेडे यांना शिखर अवघे ७५ मीटर राहिले असताना खाली उतरावे लागले. तर सुबोध वरघट, आदर्श मास्टे, निशांत सोनेकर यांना ६ हजार मीटरवरून
माघार घ्यावी लागली. शिखरावर पोहोचल्यावर अंजनगाव चे सुपुत्र प्रवीण शेळके यांनी शिखरावर आपल्या देशाचा तिरंगा ध्वज फडकवला व राष्ट्रगीताचे गायन करण्यात केले तरुणांमध्ये देशप्रेम व फिटनेसबद्दल जाणीव, जागृती निर्माण करणे हा मोहिमेमागील उद्देश होता. समाजाच्या प्रत्येक स्तरातून या मोहिमेचे कौतुक होत आहे.
मोहीम यशस्वी झाल्याबद्दल अंजनगाव सूर्जीच्या या सुपुत्राचे शहरात सर्वत्र कौतुक अभिनंदन होत आहे