हटके

अखेर अमृतपालसिंग पोलिसांना शरण

Spread the love

मोंगा / नवप्रहार न्यूज नेटवर्क

           आपल्या सहकाऱ्यां सह पोलीस ठाण्यावर हल्ला करून पसार झालेला खलिस्तानी समर्थक अमृतपालसिंग हा आज पोलिसांना शरण आला आहे.अमृतपाल ने 18 मार्च रोजी ‘ वारीस पंजाब दे ‘ या त्याच्या संघटनेच्या सदस्यांसह पोलीस ठाण्यावर हल्ला केल्यानंतर तो पसार झाला होता. आणि अटके पासून वाचण्यासाठी तो वेषांतर करून पोलिसांना चकवा देत होता.

खलिस्तानी समर्थक आणि ‘ वारीस पंजाब दे ‘ चा संस्थापक अमृतपाल सिंग  खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग याला पकडण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. अमृतपाल सिंगने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोगा पोलिसांसमोर त्याने आत्मसमर्पण केलं आहे. फरार होता. अमृतपाल सिंग याने त्याची संघटना ‘वारीस पंजाब दे’च्या सदस्यांसह पोलीस ठाण्यावर हल्ला केला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र अमृतपाल सिंग फरार झाला होता. वेषांतर करत तो पोलिसांना चकवा देत होता. पण अखेर त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे.

अमृतपाल आणि त्याच्या सहकाऱ्यांवर समाजात वितुष्ट पसरवणे, खुनाचा प्रयत्न, पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यात अडथळे निर्माण करणे अशा अनेक फौजदारी खटल्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close