क्राइम

अमरावतीत तरुणीवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार 

Spread the love

अमरावती / विशेष प्रतिनिधी

             आपल्या नातेवाईकांसोबत महाराष्ट्र भ्रमणासाठी आलेल्या आणि बडनेरा परिसरातील एका हॉटेल मध्ये वास्तव्यास असलेल्या तरुणीला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडल्याने खळबळ माजली आहे. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पोस्को सह अन्य कलमांगर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पीडित युवती तिच्या काही नातेवाइकांसोबत महाराष्ट्रात फिरण्यासाठी आली असताना अमरावतीत बडनेरा हद्दीतील एका हॉटेलमध्ये ती थांबली होती. पीडित युवती, महिला नातेवाइकांसोबत राहत असलेल्या हॉटेल परिसरात फिरत असताना राज्यभाषेत बोलत होत्या. त्यावेळी संशयित साहिल लस्कर हा सुद्धा तेथे हजर होता. त्याने त्या दोघीही संबंधित राज्यातील आहे का, अशी विचारणा केली. तोही त्याच राज्यातील रहिवासी असल्याचे सांगून दोघींचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला. परंतु संशयिताने स्वत:चे नाव सुनीलकुमार, असे खोटे सांगितले.

त्यानंतर पीडित युवती व तिची महिला नातेवाईक या फोटो काढत असताना संशयित साहिल लस्कर हा तेथे पोहोचला. स्वत: दोघींचे फोटो काढून देत असल्याचे सांगून, त्या दोघींचे फोटो स्वत:च्या मोबाईलने काढून पीडित युवतीच्या मोबाईलवर पाठवून दिले. संशयित साहिल लस्कर याने तो या भागातील रहिवासी असल्याचे सांगितले. त्यानंतर सायंकाळी साडेसातच्या सुमारास संशयित साहिल याने पीडित युवतीस फोन करून ती राहत असलेल्या रूममध्ये कोण, कोण आहे, याबाबत विचारणा केली.

बाहेर फिरण्याचा प्लॅन आहे काय, याचीही त्याने युवतीकडून माहिती घेतली. संशयित साहिल हा युवतीच्या हॉटेलमधील खोलीत आला. तिला थंडपेयामध्ये गुंगीचे औषध मिसळून ते पिण्यास दिल्यावर युवती ही बेशुद्ध झाली. त्या परिस्थितीचा फायदा घेऊन संशयित युवकाने जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा आरोप तिने तक्रारीत केला.

थोड्या वेळाने पीडित युवतीची अल्पवयीन नातेवाईक खोलीत आली. तिने विचारणा करताच तिच्यासोबत सुद्धा संशयित साहिल लस्कर याने बळजबरीचा प्रयत्न केला. पीडिता शुद्धीवर आली असता तिने सोबत घडलेला प्रकार अन्य नातेवाइकांना सांगून बडनेरा ठाण्यात तक्रार दिली. त्या आधारे बडनेरा पोलिसांनी संशयित साहिल लस्कर (वय २०) विरुद्ध अत्याचार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

यासंदर्भात बोलताना, पर्यटक युवतीस बेशुद्ध करून अत्याचार करणाऱ्या संशयित साहिल लस्कर याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया बडनेराचे पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी दिली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close