हिवरखेडमध्ये अक्षय मोरेंच्या होम मिनिस्टरची धमाल.
सौ. सुलभाताई दुतोंडे यांच्याकडून भव्य हळदी कुंकू सोहळ्याचे आयोजन.
हिवरखेड बाळासाहेब नेरकर कडुन
हिवरखेडच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. सुलभाताई दुतोंडे यांनी हिवरखेडच्या जिल्हा परिषद महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणात चार हजार महिलांचा भव्य हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात होम मिनिस्टर फेम अक्षय मोरे यांनी जवळपास चार तास धमाल उडविली. या कार्यक्रमात पहिले बक्षीस सोन्याची नथ, दुसरे बक्षीस चांदीचा शिक्का, तिसरे बक्षीस कुकर, चवथे बक्षीस हॉट पॉट तर पाचवे बक्षीस एकविस पैठण्या ठेवण्यात आल्या होत्या. अक्षय मोरे यांनी महिलांना हसवत, नाचवत महिलांना खिळवून ठेवले. महिलांनी गमतीदार उखाणे घेत कर्यक्रमात रंगत आणली तर विविध स्पर्धा व त्यातील बक्षीसानी कार्यक्रमात बहर आणला. महिलांनी उखाणे, गीत गायन, नृत्य, कविता इत्यादी सादर करून आपल्या अंगभूत कलांचे प्रदर्शन केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ. सुलभा दुतोंडे, सौ.वीजया कराळे, सौ. शिल्पा भोपळे, सौ. प्रतिभा येऊल, सौ. गोकुळा भोपळे, सौ. वैशाली वानखडे, सौ. नंदा मानकर, सौ. ममता हिवराळे, सौ. सरिता कराळे, सौ. अनिता वाकोडे, सौ. सिमा राऊत सौ. कोमल सेदानी, सौ, सविता इंगळे, सौ. सुलभा गावंडे, सौ. सुनंदा गिऱ्हे सौ ऊज्वला येऊल सौ ऊज्वला नेरकर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर रमेश दुतोंडे, महेंद्र कराळे, किरण सेदानी,बाळासाहेब भोपळे,संदिप इंगळे, संजय हिवराळे, प्रविण येऊल, महेंद्र भोपळे, रवि मानकर, नंदू शिंदपुरे, गणेश वानखडे, अन्सारभाई, बाळासाहेब नेरकर इत्यादीच्या हस्ते टीव्ही स्टार अक्षय मोरे व त्यांच्या सहकार्यांचा सत्कार करण्यात आला. प्रत्येक महिलेला सौ. सुलभाताई दुतोंडे व श्री रमेश दुतोंडे यांच्या तर्फे भेटवस्तू देण्यात आल्या.महीलांच्या सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाचे बहारदार संचालन निलीमा घूंगड मॅडम तर आयोजक रमेश दुंतोंडे यांनी ऊपस्थीतांचे आभार मानले