राजकिय

अकोला अध्यक्ष देशमुख  अजित दादांच्या पाठीशी 

Spread the love

अकोला / नवप्रहार मीडिया नेटवर्क 

                  अजित दादा यांनी राष्ट्रवादीत बंद पुकारल्या नंतर दोन्ही पवार गटांनी आता आपले लक्ष पक्ष संघटन मजबूत करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. राष्ट्रवादी फुटण्यापूर्वी पक्षाचे काही पदाधिकारी अद्यापही द्विधा मनस्थितीत आहेत. त्यामुळे काही पदाधिकारी घाई न करता सावध भूमिका घेत आहेत. तर काही आपण अजित दादा किंवा पवार साहेब यापैकी कोणाच्या बाजूने आहोत हे स्पष्ट करीत आहेत. अकोला महानगर अध्यक्ष यांनी अजितदादा यांना पाठिंबा दर्शविला आहे.

त्यांची बुधवारी अकोला महानगराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांना मुंबई येथे त्यांना नियुक्तिपत्र दिले. (

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये खूप मोठे उलटफेर झाले. त्यात शरद पवार व अजित पवार असे दोन गट पडले. यामुळे अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे अकोला महानगराध्यक्ष विजय देशमुख हे मुंबईत अजित पवार यांच्या शपथविधीसाठी आवर्जून उपस्थित होते. या कारणाने शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देशमुख यांना तत्काळ बडतर्फ करण्यात येत असल्याचा आदेश काढला होता.

 

 

देशमुख हे अजित पवार यांच्या गटात सहभागी असल्याने त्यांच्याकडे अकोला शहराची जबाबदारी कायम ठेवली जाणार ही अपेक्षा होती. त्यानुसार आज (ता. १२) राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांचे शासकीय निवासस्थान देवगिरी येथे अकोला महानगरध्यक्षपदी विजय देशमुख नियुक्ती करण्यात येत असल्याचा आदेश प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे हस्ते देशमुख यांना देण्यात आला.

आमदार अमोल मिटकरी व नवनियुक्त जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्याकडे अकोला महानगराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. पक्ष वाढीसाठी जोमाने कार्य करण्याची ग्वाही या प्रसंगी विजय देशमुख यांनी दिली. विजय देशमुख यांच्या नियुक्तीपूर्वी कृष्णा अंधारे यांचीही अकोला जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.!

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP)शरद पवार (Sharad Pawar) व अजित पवार, असे दोन गट पडल्यानंतर शरद पवार यांनी येवल्यात सभा घेऊन ॲक्टीव्ह मोडवर आल्याचे दाखवून दिले. तर अजित पवार गटानेही जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांच्या नियुक्‍त्यांचा धडाका लावला आहे. नागपुरात अजित पवार (Ajit Pawar) गटाचे कार्यालय सुरू झाले आणि त्यांचा एक मेळावाही पार पडला. स्पर्धेत कोणता गट पुढे निघतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close