हटके

भुसावळ – नंदुरबार पॅसेंजर ट्रेन वर अमळनेर मध्ये दगडफेक 

Spread the love

जळगाव / प्रतिनिधी

 जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे अमळणेर मध्ये भुसावळ-नंदुरबार पॅसेंजवर तुफान दगडफेक करण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळच्या वेळी ही घटना घडली.

घटनेत ट्रेन मधील कोणत्याही प्रवाशाला कोणतीही इजा किंव्वा दुखापत झाली नसली तरी या घटनेमुळे प्रवासी चांगलेच घाबरले आहेत. या घटनेचा व्हिडीओ बनवण्यात आला आहे.

या व्हिडीओत तुम्हीला पहायला मिळू शकते की, रेल्वे रुळाच्या आजू बाजूला जमले आहेत. यावेळी ते पॅसेंजर ट्रेनवर दगडफेक करत आहेत. ट्रेनमधील प्रवासी घाबरुन आरडाओरड करतं आहेत.

 

 

भुसावळ-नंदुरबार पॅसेंजरमधून दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवासी प्रवास करत असतात. कारण सर्वसामान्यांसाठी वाहतुकीचं चांगल साधन अशी या ट्रेनची ओळख आह. अस जरी असंल तरी गेल्या कही दिवसांपासून ही ट्रेन जास्तच उशिराने धावत आहे.

यामुळे प्रवाशांसह नागरिकांमध्ये खदखद होती. याच खदखदीचं रुपांतर संतापात होवून ही दगडफेक झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यावेळी अनोळखी व्यक्तीने ट्रेनची साखळी खेचून गाडी थांबवली. यानंतर ही दगडफेक झाली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close