अपघात

अमरावती येथील तरुणीचा पुणे येथे अपघातात मृत्यू 

Spread the love

रस्ता ओलांडताना मोबाईल वर बोलणे जीवावर बेतले 

अमरावती / नवप्रहार डेस्क 

                 नोकरीच्या शोधात पुणे येथे गेलेल्या तरुणीचा अपघाती मृत्यू झाला आहे. आरती सुरेश मनवाणी वय ( 23) रा. रामपुरी कॅम्प , अमरावती असे तिचे नाव आहे. रस्ता ओलांडताना मोबाईल वर बोलणाऱ्या आरतीला डंपर ने धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान तिला एका कंपनीत नोकरी मिळाल्यावर अमरावती येथे चार दिवसापूर्वीच ती आली होती. 8 ऑक्टोबर रोजी ती पुन्हा पुणे येथे परत गेली.

दरम्यान तेथे 9 ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान कोथरूड परिसरातून कर्वेनगर येथे कंपनीमध्ये जात असताना तिचा अपघात झाला. आरती ही मोबाईलवर बोलताना रस्ता क्रॉस करत होती. त्यावेळी भरधाव आलेल्या डंपर टिप्पर वाहनाने तिला धडक दिली. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला.

पश्चात पुण्यातच शवविच्छेदन करून आरतीचा मृतदेह अमरावती मध्ये आणल्यावर गुरुवारी 10 ऑक्टोंबर रोजी हिंदू स्मशानभूमीत नातेवाईकांच्या उपस्थितीत तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशन हद्दीत हा अपघात झाला असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपी चालकाला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close