स्वातंत्र्यदीनी मांडवा हेटी गावक-याचा घाटंजी पांढरकवडा रस्ता रोको.
तिनं पिढ्या गेल्या तरी हेटी गावाला जाण्यासाठी रस्ताच नाही गावक-याची संतप्त प्रतिक्रिया.
आंदोलकांवर गुन्हे दाखल, लोकप्रतिनिधीचे रस्ताबाबत दूर्लक्ष
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
घाटंजी पांढरकवडा रोडवरील मांडवा जवळून ज्यास्तीत ज्यास्त गवळी समाजाचे वास्तव्य असलेल्या हेटी या गावांसाठी स्वातंत्र्य काळापासून अद्याप पर्यंत पक्का रस्ता नाही.नाल्यातून वाट काढत गावकरी रोज दूधाचे देवानं,शाळकरी मुलांना नाल्यातून येजा करावी लागते.मुख्य बाजारपेठ,शाळा ही १५ किमी आसपास घाटंजी पडत असून दैनंदीन घाटंजीला गावकरी येजा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. रस्ता देण्यासाठी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला मात्र त्याचा काही उपयोग होत नाही त्यात यंदा पावसात नाल्याला आलेल्या पाण्यातून जिवघेणा शाळकरी व गावकरी प्रवास पाहून गावक-यांनी एकजूट होत ऐन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी रस्तारोको चे निर्णय घेतला. यामुळे पांढरकवडा घाटंजी रस्ता वाहतूक ३ तास कोलमंडली.आदोलन दरम्यान स्थाणिक आमदार डॉ. संदीप धूर्वे यांनी भेट दिली तेव्हा संतप्त गावक-यांणी आता तरी हा रस्ता होणार का नाही? हा प्रश्न उपस्थित केला. यावेळी परिक्षाविधीन तहसिलदार सेलोटकर,मंडळ अधिकारी टापरे, पवन बोन्डे तलाठी,मांडवा हेटी ग्रामवासी व आंदोलक उपस्थित होते.यावेळी ग्रामस्थांनी तलाठी मनमानी कारभार करतात व सांडपाणी वाहण्यासाठी उभारण्यात आलेल्या नालीचे काम निकृष्ट दर्जाचे आहे, अंगणवाडी केंद्रातील काम ढसाळ असल्याचेही कैपियत मांडली.सोबतच येत्या काही दिवसांत जर रस्ता बांधकाम समस्या मार्गी लावली नाही तर,पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलन कर्ते कडून देण्यात आला. वाहतूक व्यवस्था काहीकाळ ठप्प झाल्याने घाटंजी ठाणेदार निलेश सुरडकर व शशिकांत नागरगोजे,अमित लोखंडे, तहसिलदार यांनी आंदोलक ग्रामस्थ यांच्यात चर्चा करून तोडगा काढला व आश्वासन नंतर वाहतूक व्यवस्था सूरळीत करण्यात आली.