अखेर भाजपा ला मुख्यमंत्री निवडीचा मुहूर्त सापडला

नवी दिल्ली / नवप्रहार ब्युरो
राजधानी दिल्लीचा निकाल येऊन ११ दिवसांचा कालावधी उलटला आहे. भाजपा ने ७० पैकी ४८ जागांवर विजय मिळवत सत्ता मिळविली आहे. दिल्लीचा मुख्यमंत्री कोण ? याची उत्सुकता जगाला लागली होती. मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर होत नसल्याने आप कडून भाजपा नेतृत्वाचा हसा उडवण्यात येत होता. पण आता भाजपा कडून मुख्यमंत्री च्या नावाची घोषणा करण्यात आली असून रेखा गुप्ता या राजधानीच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळणार आहेत.
दिल्लीतील भाजप आमदारांच्या बैठकीत रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे आता दिल्लीची कमान महिला सांभाळणार आहे. नव्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत आघाडीवर असलेले प्रवेश शर्मा यांचं नाव उपमुखमंत्रिपदासाठी निश्चित झालं आहे.
तर आता रेखा गुप्ता आता २० फेब्रवारी रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
भाजपच्या बैठकीत वरिष्ठांची नियुक्ती
रेखा गुप्ता आणि प्रवेश वर्मा बुधवारी साडे बारा वाजता रामलीला मैदानात शपथ घेतील. यावेळी मंत्रिमंडळाचाही शपथविधी होणार आहे. भाजपाच्या वरिष्ठांनी आमदारांच्या बैठकीत वरिष्ठ नेता ओपी धनखड आणि रविशंकर प्रसाद यांची नियुक्ती केली होती.
११ दिवसानंतर मुख्यमंत्रिपदाची घोषणा
दिल्लीत भाजपाला २६ वर्षांनी मोठा विजय प्राप्त झाला आहे. आठ फेब्रवारी रोजी भाजपला ७० जागांपैकी ४८ जागा मिळाल्या. त्यानंतर ११ दिवसांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाच्या नावाची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यासाठी उशीर लागत असल्याने आम आदमी पक्षाकडून टीका केली जात होती.
कोण आहेत रेखा गुप्ता?
रेखा गुप्ता दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री ठरणार आहेत. तर सध्या देशातील दुसऱ्या महिला मुख्यमंत्री ठरणार आहेत. त्यांनी आप नेता बंदना कुमारी यांना २९,५९५ मतांनी धूळ चारली. रेखा गुप्ता यांना ६८,२०० मते मिळाली. तर बंदना कुमारी यांना ३८,६०५ मते मिळाली. काँग्रेसच्या प्रवीण जैन यांना ४,८९२ मते मिळाली.
रेखा गुप्ता भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अपाध्यक्षा आहेत. त्या हरियाणाच्या जींद येथे राहणाऱ्या आहेत. त्या दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या सचिव आणि अध्यक्ष राहिल्या आहेत. त्यांनी २००७ आणि २०१२ साली उत्तरी पीतमपुरा या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र, त्यांना दोन वेळा पराभवाचा सामना करावा लागला.