खेळ व क्रीडा

आकाशदिप च्या त्या कृत्यांने जिंकली देशवासीयांची मने 

Spread the love

रांची / नवप्रहार मीडिया 

             चौथ्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला विश्रांती देत त्याच्या जागी वेगवान गोलंदाज आकाशदिप ला संधी देण्यात आली आहे. त्याला टेस्ट कॅप मिळल्यावर त्याने मैदानाबाहेर उभ्या असलेल्या आईला चरणस्पर्श केला. आणि तिचे आशीर्वाद घेतले. त्याच्या या कृत्यांने देशवासीयांची मने जिंकली आहेत.

भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपला कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली. रांची येथे प्रशिक्षक राहुल द्रविडने त्याला कसोटी कॅप दिली. आकाश दीप भारताकडून कसोटी क्रिकेट खेळणारा 313 वा खेळाडू ठरला आहे.

रांचीच्या स्टेडियममध्ये जेव्हा ही टेस्ट कॅप आकाश दीपला देण्यात आली. तेव्हा आकाश मैदानाबाहेर उभ्या असलेल्या त्याच्या आईकडे गेला. त्याने चरण स्पर्श करत आईचा आशीर्वाद घेतला. यावेळी तेथे उपस्थित त्यांचे कुटुंबीय खूपच भावूक झाले.

यावेळी आकाशच्या आईसह त्याचा भाऊ आणि नातेवाईकही तेथे उपस्थित होते. त्याच्या पदार्पणाच्या सामन्यातच आकाश दीपने इंग्लंडविरुद्ध गोलंदाजी केली. त्याने भारताला धमाकेदार सुरुवात करून दिली. आकाश दीपला तीन विकेट घेण्यात यश आले. त्याच्या पहिल्या कसोटी सामन्यातच आकाश दीप आपल्या गोलंदाजीचे पराक्रम सिद्ध करत आहे.

2020 मध्ये आयपीएल लिलावादरम्यान आकाशदीपला रॉयल चॅलेंज बंगळुरू संघाने 20 लाख रुपयांना खरेदी केले होते. आकाश दीपच्या नावावर 28 लिस्ट ए सामन्यात 42 विकेट्स आहेत. आकाशच्या नावावर 30 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 104 विकेट्स आहेत.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close