अजितदादा पवार सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे नेते
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयास भेट
सुबोध मोहिते च्या विरोधात राष्ट्रवादी च्या पदाधिकाऱ्यात प्रचंड रोष
आर्वी / प्रतिनिधी
सुबोध मोहितेकडून पदाधिकाऱ्यांना प्रफुल भाई पटेलांचा नावाचा वापर करून थेट पक्षातून काढण्याच्या धमक्या
मोहिते हटाव -च्या घोषणा, अजितदादा पवार कडे पदाधिकाऱ्यांच्या लेखी तक्रारी
आर्वी : काल दिनांक 21/एप्रिल /2024 ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची महायुती चे उमेदवार रामदासजी तडस यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा गांधी चौक येथे आयोजित केली होती,
यावेळी अजितदादा पवार यांच्या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयास अधिकृत भेट असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेच राष्ट्रीय सरचिटणीस सुबोध मोहिते यांनी अजितदादा पवार यांना चुकीची माहिती देत भेट टाळण्यासाठी फिल्डिंग लावली, उलट दादा पार्टी कार्यलयात यायला इच्छुक नाही अशी बतावणी सुबोध मोहिते यांनी, जिल्हाध्यक्ष शरद शहारे व दिलीप पोटफोडे आर्वी विधानसभा अध्यक्षाना केली, तेंव्हा कार्यकर्ते नाराज झालेत,परंतु दादांचं प्रेम दादांचा जीव पदाधिकारी कार्यकर्त्यांत असताना दादा असं कस म्हणतील म्हणून राष्ट्रवादी चे वर्धा जिल्हाध्यक्ष शरद शहारे, ग्रा. महिला जिल्हाध्यक्षा अश्विनी शिरपूरकर,आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे, पुलगाव देवळी विधानसभा अध्यक्ष तुषार वाघ, हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष, विठ्ठलराव पोहाणे, ओ बी सी सेल जिल्हाध्यक्ष गणेश चांभारे,सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष कपिल मुन,रोजगार व स्वयं रोजगार सेल जिल्हाध्यक्षा रेखा वानखडे, युवक विधानसभा अध्यक्ष कमलेश चिंधेकर व प्रमुख पदाधिकारी सभेत पोहचून दादांना यां बाबतीत माहिती दिली असता दादांनी सांगितले कि तिथे यायला रस्त्याची अडचण असल्याची चुकीची माहिती मिळाली होती, पण माझ्या पदाधिकाऱ्यांसाठी रस्त्याची अडचण असली तरी मी सभा झाल्या झाल्या पार्टी कार्यलयात येतो यावेळी सर्व कार्यकर्त्यांच्या मनात एकच भावना होती अजितदादा हे सर्व सामान्य कार्यकर्त्याचे नेते, आणि दादा पार्टी कार्यालयात आले असताना विठ्ठल रुक्मिणी ची मूर्ती भेट म्हणून स्वीकारताना, आणि पक्ष पदाधिकार्यात इतकी ऊर्जा आणि शेकडो कार्यकर्त्याच्या घोषणानी दादा गदगद झालेत आणि पार्टी आणि मी तुमच्या सोबत आहे असा शब्द यावेळी अजितदादा नी दिला,
तर दुसरीकडे सध्या वर्धा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या पदाधिकारी कार्यकर्त्यात सुबोध मोहिते विरोधात प्रचंड रोष असून, सुबोध मोहिते कडून पक्षाचं खच्चीकरण सुरु असून, विरोधकांना हातात घेऊन पार्टीतल्या होतकरू पदाधिकारी कार्यकर्त्यांना नामशेष करण्याचा कार्यक्रम सुबोध मोहिते करत असून राष्ट्रवादी चे नेते असताना राष्ट्रवादी ला बळ देण्याऐवजी राष्ट्रवादी संपवण्यासाठी त्यांचे आटोकाट प्रयत्न सुरु आहे, याचा प्रत्यय हिंगणघाट ला जिल्हाध्यक्ष शरद शहारे यांना त्यांच्याच विधानसभा क्षेत्रात झालेल्या सभेपासून दूर ठेवताना आला, काल आर्वी येथील पक्ष कार्यालयात अजितदादा कशे पोहचणार नाही याची खास काळजी त्यानी घेतली, राष्ट्रवादी काँग्रेस ला महायुती च्या उमेदवारासाठी अद्याप पर्यंत प्रचार यंत्रणा न भेटू देण्यामागे ही सुबोध मोहिते च कारणीभूत असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नामशेष कशी होईल यासाठी त्यांचे शर्थी चे प्रयत्न आहेत, तर पक्षातील पदाधिकाऱ्यांना प्रफुल भाई पटेलांच्या नावाचा वापर करून पक्षातून काढून टाकण्याच्या धमक्या त्यांच्या कडून दिल्या जातात , महिलांपदाधिकाऱ्यांशी अर्वाच भाषा, दुय्यम वागणुकीमुळे पदाधिकारी त्रस्त असून काल पदाधिकारी यांचा सहनशिलतेचा बांध फुटला आणि सुबोध मोहिते हटाव – वर्धा जिल्हा बचाव च्या घोषणानी पदाधिकारीकार्यकर्त्यांच्या संतप्त भावना उमटल्या, यावेळी शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते