राजकिय

खोटं फार काळ टिकत नाही ; मैदानात उतरा आणि ठोकुन काढा 

Spread the love

पुणे / नवप्रहार डेस्क

                  जनतेला खोट्या माहितीच्या आधारे लोकसभेत फसवलं. पण महाविकास आघाडीचा हा फुगा लवकरच फुटणार आहे. कारण खोटं फार काळ टिकत नाही. कार्यकर्त्यांना परवानगीची गरज नाही . मैदानात उतरा आणि ठोकून काढा असा आदेश त्यांनी कार्यकर्त्याना दिला. सोबतच सोशल मीडियावर अपडेट राहण्याची विनंती देखील त्यांनी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केली आहे. भाजपा च्या महाधिवेशनात बोलतांना त्यांनी हे भाष्य केलं आहे.

आज आपण फक्त ग्राऊंडवर राहून चालत नाही. ग्राऊंडवर तर काम करतच आहोत. परंतु, सोशल मीडियावर जर अपडेट नाही राहिल तर लोकांना फसवल जाऊ शकतं. त्यामुळे कार्यकर्त्यांसह लोकप्रतिनिधींनाही विनंती आहे की आपण रोज यावर बोललं पाहिजे. रोज एक पोस्ट अशी करा की हा फेक नरेटीव्ह संपला पाहिजे. तसंच, लोकप्रतिनिधीचीही यावर काही पोस्ट नसते. त्यांनी लक्ष घातलं पाहिजे. कारण ही लढाई फक्त ग्राऊंडवर नाही असंही फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.

शरद पवारांना प्रश्न

यावेळी बोलताना फडणवीसांनी आरक्षणावरही भाष्य केलं आहे. ते म्हणाले महाराष्ट्रात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. समाज एकमेकांसमोर उभा आहे. कुणी कुणाशी बोलत नाही. सरकार येतील जातील परंतु, समाजात दुफळी राहिली तर समाज तीन तीन पिढ्या एकत्र येत नाही. त्यामुळे हे थांबलं पाहिजे. तसंच, भाजपचा आरक्षणाला पाठिंबा आहे. गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळायला हव ही आमची भूमिका आहे असंही फडणवीस म्हणाले आहेत. तसंच, चारवेळा मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार मराठा समाजाला आरक्षण का देऊ शकले नाहीत असा प्रश्नही फडणवीसांनी यावेळी उपस्थित केला आहे.

मराठा आरक्षणचा लढा कधी उभा राहिला. 1982 साली हा लढा उभा राहिला. आण्णासाहेब पाटील यांनी आरक्षणाची मागणी केली. त्यावेळी काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. त्यांना आण्णासाहेब पाटील म्हणाले, तुम्ही आरक्षण नाही दिलं तर मी तीव देईल. त्यावर ते मुख्यमंत्री म्हणाले नाही देत जा, त्यानंतर आण्णासाहेब पाटलांना गोळी घालून घेत स्वत: आत्महत्या केली. त्यामुळे मराठा आरक्षणाच पहिला बळी आण्णासाहे पाटील हे आहेत. तसंच, माझा प्रश्न आहे उद्धव ठाकरे, शरद पावार आणि नाना पटोले यांना. तुम्ही हे जे आंदोलन सुरू आहे त्यामधील जी ओबीसी आरक्षण देण्याची मागणी आहे तीला समर्थन आहे का? हे सांगा अस जाहीर आव्हान फडणवीसांनी यावेळी दिलं.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close