अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धात सरस्वती विद्यालय राजेगावच्या विद्यार्थ्यांची निवड
माजलगाव : ( प्रतिनिधी) एमॅच्युअंर खो-खो असोसिएशन,बीड व शारदा स्पोर्ट्स अकॅडमी गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरुष-महिला / कुमार-मुली / किशोर-किशोरी बीड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा दि.29/10/2023 वार रविवार रोजी शारदा स्पोर्ट अकॅडमी गेवराई जगदंबा आय टी आय येथे संपन्न झाली.या निवड चाचणी करिता जिल्ह्यातील एकुण 350 मुले व मुली जिल्हास्तरीय जिल्हा अजिंक्य व निवड चाचणी स्पर्धेत सहभाग नोंदवला.या मध्ये सरस्वती विद्यालय राजेगाव येथील कुमार मुली गटामध्ये गायत्री शिवाजी कचरे व श्रेया केशव कचरे तसेच किशोरी गटामध्ये समीक्षा सुधाकर गरड व प्रतीक रामप्रसाद कचरे हे खेळाडू ठाणे जिल्ह्यातील पालघर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धेत बीड जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे. ह्या सर्व खेळाडूंना नितीन पुटवाड यांचे मार्गदर्शन लाभले.
या खेळाडूंच्या यशा बद्दल बीड जिल्ह्याच्या जिल्हा क्रिडा अधिकारी श्रीम. सुहासिनी देशमुख मॅडम तसेच संस्थेचे अध्यक्ष मा.आ. राधाकृष्ण होके पाटील, संस्थेचे सचिव अशोक होके पाटील, संस्थेच्या संचालिका योगिता होके, संस्थेचे संचालक अभय होके व मुख्याध्यापक अशोक कचरे व राजेगाव,सुर्डी, रीदोरी कवडगाव, वाघोरा, शहाजानपूर येथील गावाकऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धे साठी शुभेच्छा दिल्या. व शाळेचे शिक्षक गुंदेकर सर, तुकाराम चौरे, सय्यद गयास, अनंत राठोड, दीपक कवडे, गणेश महाजन, मुरलीधर भाळशंकर, विशाल सोळंके,देशपांडे सर, श्रीम. शिंदे, बिडवई फरजाना ,कदम सर, ओम कचरे, रवि साळवे यांनी कौतुक केले.