शाशकीय

दोन महिन्यानंतर सुटला नगरपंचायतीमधील कामगारांचा तिढा

Spread the love

 

खासदार सुनील मेंढे यांची यशस्वी मध्यस्ती

भंडारा / राजू आगलावे

भंडारा: भंडारा जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या लाखनी नगर पंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांनी सुरू केलेले असहकार आंदोलन मागे घेण्याच्या दृष्टीने खासदार सुनील मेंढे यांनी मध्यस्थी करुन, सकारात्मक चर्चा करुन, दोन महिन्यांपासून सुरू असलेले आंदोलन संपून शहरातील घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यास सुरुवात होणार आहे. यामुळे खासदारांची मध्यस्ती मजूर आणि लाखनीकरांच्या दृष्टीने यशस्वी आणिअत्यंत महत्त्वाची ठरली आहे.
मागील दोन महिन्यांपासून लाखनी नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील मजुर असहकाराच्या भूमिकेत होते. दोन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने आणि ईएपीएफ भरला जात नसल्याचे कारण पुढे करून सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे लाखनी नगर पंचायत क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापनाचा गोंधळ उडाला होता. शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला होता. याची माहिती खासदार सुनील मेंढे यांना होताच त्यांनी लाखनी नगरपंचायत गाठून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चौधरी, नगराध्यक्ष त्रिवेणी पोहरकर, कामगार आणि नगरसेवकांचे उपस्थितीत तोडगा बैठक घेतली. सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर खासदारांनी कामगारांचे दोन महिन्याचे पगार ताबडतोब काढण्याचे निर्देश नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले. सोबतच ईपीएफ चा विषय टाळणाऱ्या संबंधितांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचे निर्देशही देण्यात आले. खासदारांच्या या यशस्वी मध्यस्थीनंतर असहकार सोडून कामावर रुजू होण्याचे आश्वासन यावेळी दिल्याने मागील दोन महिन्यांपासून होत असलेली लाखनीकरांची गैरसोय आता दूर होऊन शहर स्वच्छतेच्या दृष्टीने प्रयत्न सुरू होणार आहे.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष शिवराम गि-हेपुंजे, नगराध्यक्षा त्रिवेणीताई पोहरकर, मुख्याधिकारी सतीश चौधरी, उपाध्यक्ष प्रदीपजी तितरमारे, बांधकाम सभापती राजेशजी निम्बेकर, नगरसेवक सत्यवानजी वंजारी, संदीपजी भांडारकर, महेशजी आकरे, सचिनजी भैसारे, समाजिक कार्यकर्ता प्रणयजी शामकुवर, छोटू सदनवार, अजय गि-हेपुंजे, मोहन पोहरकर, अनील मोहनकर, किशोर वंजारी व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

पुढाकार घेऊन खासदारांनी स्वतः हा विषय मार्गी लावण्याचा दृष्टीने केलेले प्रयत्न कामगार आणि नागरिकांच्या साठी सकारात्मक ठरले असून यासाठी कामगारांनी खासदारांचे आभार मानले आहेत..

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close