यवतमाळात ड्रोनचा वापर करण्यास तात्पुरती बंदी
पंतप्रधानांच्या दौऱ्यावर लक्ष
याबतमाल / प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत यवतमाळ शहराजवळील “भारी” येथील मैदानात आज बुधवार 28फेब्रुवारीला भव्य कार्यक्रम होणार आहेत. सुरक्षेच्या दुष्टीकोनातून यवतमाळ जिल्ह्यच्या हद्दीत ड्रोन प्रक्षेपण व ड्रोन वापरावर तात्पुरती बंदी घातली आहेत. या कार्यक्रमासाठी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हेलिकॉप्टर ने येणार आहेत.
नागपूर-तुळजापूर महामार्गाने कार्यक्रम स्थळी ते जाणार आहेत. त्यामुळे पंतप्रधानांची व संपूर्ण कार्यक्रम च्या सुरक्षेच्या दुष्टीने जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी फौजदारी प्रकिया सहिता 1973चे कलम 144 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून यवतमाळ जिल्हा च्या हद्दीत ड्रोन प्रक्षेपण व वापरावर बंदी घातली आहेत. ही बंदी 24फेब्रुवारी ते 28फेब्रुवारी च्या मध्य रात्री 12वाजेपर्यंत राहणार आहेत. बंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वर उचीत ती कारवाई केली जाईल,असे सदर आदेशात नमूद केले आहेत. नवप्रहार च्या वाचकासाठी ही माहिती आमच्या प्रतिनिधीने कळवली आहेत.